"तो ओठाचा स्पर्श अजुनही जाणवतो मला माथ्यावर तुझ्या भावना अबोल होऊन बोलल्या त्या मनावर माझीच तु आणि तुझाच मी एक जाणीव होती नात्यावर विसरुन जाईल जग हे सारे जादु कसली ही क्षणांवर!! तो ओठाचा स्पर्श अजुनही जाणवतो मला हातावर तुझ्या सवे चालताना सोबत हवी त्या वाटांवर कधी नसेल एकटाच मी जाणीव करते मनावर देईन साध तुझी अखेरपर्यंत सांगतो तो स्पर्श ह्रदयावर!! तो ओठाचा स्पर्श अजुनही जाणवतो मला गालावर रुसलेल्या मला तो जणु बोलतो या ह्रदयावर क्षणात जातो राग कुठे दिसतो ना मनावर तो ओठाचा स्पर्श तुझ्या हसु उमटवतो माझ्या ओठावर.. !!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*