कधी कधी या वेड्या मनाला
 समजावून सांगता येत सखे!!
 पण डोळ्यातले अश्रू आजही
 खरं बोलून जातात!!

 पाहून ही न पाहता कधी
 लपवता येत या नजरेस!!
 आणि अधीर त्या वाटा
 मला तिथेच घेऊन जातात!!

 आठवूनही कधी न बोलता
 विसरून जाता येत त्या वेळेस!!
 पण क्षणा क्षणाला तुझ्या आठवणी
 मला खूप पाहून जातात!!

 कधी कधी भास तुझे ते
 उगाच तुला शोधतात सखे!!
 पण ते मनातल्या मृगजळा सवे
 मला स्वप्नात घेऊन जातात!!

 हवंय काय या मनाला तरी
 विचारलं मी कित्येक वेळेस!!
 आणि हे मन मला तेव्हा
 तुझ्याच प्रेमात घेऊन जातात!!

 उरल्या त्या अखेरच्या श्वासात
 तुलाच फक्त पहायचंय सखे!!
 पण तुझी कित्येक वचने
 मला माझ्यात अडकवून जातात!!

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE