"मनातले सांगायचे कदाचित
 राहुन गेले असेनही!!
 पण डोळ्यातले भाव माझ्या
 तु वाचले नाहीस ना!!

 हात तुझा हातात घेऊन
 तुला थांबवायचे होते ही!!
 पण तु जाताना तुझा हात
 मी सोडला नाही ना!!

 सांग प्रिये दुर तु असताना
 तुला भेटायचे राहिले असेनही!!
 पण जवळ तु असताना माझा मी
 माझ्यातच राहिलो नाही ना!!

 अबोल राहून प्रेम करताना
 मन हे तुला बोलले असेनही!!
 पण कधी ते तुझेच नाव घेताना
 तु ऐकले नाहीस ना!!

 हे प्रेम मनातील माझ्या
 तुझ्यासाठीच फक्त होते!!
 पण तुला ते सखे कधी
 कळलेच नाही ना!!"
-योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*