“फुलांच्या पाकळ्या मधील
सुगंध तुच आहेस ना
ही झुळुक वार्‍याची जणु
जाणीव तुझीच आहे ना

तु स्पर्श ह्या मनाचा
भावनेत तुच आहेस ना
प्रेम हे माझे असे की
मन तुझेच आहे ना

हे सांगते मला का
तु भास तर नाही ना
हे बोलते असे का
तु स्वप्न तर नाही ना

सांग या वेड्या मनाला
तु माझ्या ओठांवर आहेस ना
बोल तु त्या नभाला
तु माझ्या मिठीत आहेस ना

चांदणे पाहते का असे
ते तुलाच हसत नाही ना
प्रेम हे तुझ्या मनातील
मला तर सांगत नाही ना!!”

:योगेश खजानदार

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा