“मला काही ऐकायचंय
तुला काही सांगायचंय
मनातल्या प्रेमाला
कुठे तरी बोलायचंयलाटां सोबत दुर जाताना
डोंगराशी भेटायचंय
आठवणींच्या नदीला
समुद्राशी बोलायचंयथोडंसं सुरांना घेऊन
थोडंस कवितेत गायचंय
प्रेमाच्या या संगिताला
पुन्हा पुन्हा ऐकायचंयकधी शांत वाटेवर
कधी उन्हात जायचंय
जीवनाच्या प्रवासात
तुझ्या सोबत चालायचंयअबोल या डोळ्यांना
खुप काही सांगायचंय
मनातल्या प्रेमाला
कुठे तरी बोलायचंय!!”✍️योगेश