मनातली सखी || MANATLI SAKHI || LOVE ||

"कधी कधी मनातली सखी
  खुपच भाव खाते!!
  पाहुनही मला न पहाता
  माझ्या नजरेत ती रहाते!!
  चांदण्याशी बोलताना मात्र
  खुप काही सांगते!!
  माझ्याशी अबोल राहुन मात्र
  फक्त मला छळते!!

 कधी कधी मनातली सखी
  अनोळखी त्या चंद्रास बोलते!!
  समोर असणाऱ्या माझ्याकडे
  फक्त बघत असते!!
  मधेच चार शब्द रागाचे
  उगाच मला बोलते!!
  मन मात्र वेडे माझे
  तिचे शब्द ऐकत असते!!

 कधी कधी मनातली सखी
  कवितेत मला सापडते!!
  शब्दांसवे लिहिताना तिला
  उगाच रुसत रहाते!!
  कागदावरचे शब्दही तेव्हा
  तिलाच शोधत बसते!!
  शोधुन सापडल्यावर तिला
  आपलंस करत असते!!
  आणि मनातली सखी मात्र
  तेव्हा उगाच भाव खात असते. !!!"

✍️©योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *