मनातलं || MARATHI PREM KATHA KAVITA ||

"तुझ्या जवळ राहुन मला
 तुझ्याशी खुप बोलायच होतं!!
 तुझ्या डोळ्यात पाहुन तेव्हा
 माझ्या मनातल सांगायच होतं!!

 कधी नुसतच शांत बसुन
 तुला पापण्यात साठवायच होतं!!
 तर कधी उगाच बोलताना
 तुला मनसोक्त हसवायच होतं!!

 त्या नेहमीच्या वाटेवर
 तुला रोज भेटायच होतं!!
 नकळत तरी तेव्हा मला
 तुझ्या मनात रहायचं होतं!!

 चिंब पावसात भिजलेलं
 तुझ ते हसु पहायचं होतं!!
 गार वार्‍या सोबत झुलताना
 कधी स्वतःला हरवुन जायचं होतं!!

 वहितल्या शब्दांना पुन्हा
 ओठांवर आणायचं होतं!!
 आणि तुझ्या डोळ्यात पाहून तेव्हा
 माझ्या मनातल सांगायचं होतं..!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*