मनातलं प्रेम || LOVE STORIES ||

Share This

तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसज तिचाच आला.
“अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!”
त्याने रिप्लाय केला,
“मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही! ” ..

आणि दोघांच संभाषण सुरु झालं. हळुहळु दोघांच बोलणं वाढलं.. सहज बोलन रोजच झालं. सकाळी गुड मॉर्निंग पासुन ते रात्री गुड नाईट पर्यंत बोलन चालु लागलं. दोघांच्या आवडी निवडी एकमेकांना कळु लागल्या. प्रत्येक चांगली वाईट गोष्ट तिला कधी सांगतोय अस त्याला वाटु लागलं .. आज दिवसभर काय घडल हे त्याला सांगावंस तिला वाटु लागलं. मेसेज नंतर फोनवर रोज बोलणं होऊ लागलं.. दोघांच एक छोटस जग तयार झालं,  सहजच बोलणं त्याला प्रेम वाटु लागलं. पण तिला कस व्यक्त करावं हे मनातल सगळं म्हणुन तो रोज “तुला काहीतरी सांगायचंय मला!” अस म्हणुन पुन्हा “काही नाही, जाऊ दे!” अस म्हणुन टाळु लागला. तिलाही ते कळत होतं सहजच बोलणं आता सहजं राहिलं नव्हतं. त्यात प्रेमाची चाहुल लागली होती.


   पण एक दिवस त्याचा फोन वाजला, त्याने फोन उचलताच कोणी एक बोलु लागला. मनाच्या पटलांवर जोरदार घात झाला. तिच्या प्रियकराने त्याला खुप काही सुनावलं होतं. तो ही सगळ निमुटपणे ऐकत होता. बोलायला काहीच राहिल नव्हतं. उरले होते ते फक्त मनातल्या प्रेमावर घात होऊन विस्कटलेले आठवणींचे तुकडे. ती सहज म्हणुन आली होती की सहजच बोलली होती. प्रेम आणि मैत्री यात गल्लत करुन तो कुठे चुकला होता का? ” की मला तुला काहीतरी सांगायचंय!” ते काय हे तिला कळुनही तिने ते अंतर जाणलंच नाही कधी.


   तिचा प्रियकर होता ती निघुन गेली. नंतर 2 4 साॅरीचे मेसेजेस त्याला करुन ती विसरुनही गेली. मैत्री आणि प्रेम यातलं अंतर तरी काय असतं हे न सांगताच गेली. मग चुक ती कोणाची होती. सहजच म्हणुन सुरू झालेल हे तितकेस सहज नाही राहील हे तिला कळत होतंच ना. की फक्त बोलावंस वाटतं म्हणुन झालेला संवाद होता तो?. पण संवाद कुठेतरी थांबतो .. पण जिथे संवाद थांबतच नाही ते प्रेम असतं


  कित्येक गोड गोष्टींच गाठोडं घेऊन तो शांत होता. ती निघुन गेली तरी तिच्यावर न रागावत तिच्या साठी जगतं होता. मनातल्या प्रेमाला शब्दात लिहितं होता .. आणि कवितेत तिला आपलंस करत होता .. ते प्रेम होतं की मैत्री याची गल्लत करत होता .. चुक तिची होती की माझी हे विसरूनही आजही तो तिच्यावरच प्रेम करत होता .. अगदी मनातुन. .

समाप्त

✍️योगेश

READ MORE

शोधाशोध || MARATHI KAVITA SHODHASHODH !!

डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ?? ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची?? एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ??…

सकाळ || MORNING MARATHI POEM || GOOD MORNING ||

जागी झाली नदी, जागे ते घरही होत आहे !! अजूनही झोपल्या त्या, अंगणास जाग येत आहे !! पसरल्या त्या धुक्यात,…

मार्ग || MARG MARATHI KAVITA ||

शोधावी ती माणसं जी स्वप्नांशी झुंजत असतात झोपलेल्या उगाच पाहत वेळ वाया घालवू नये

विठू माउली VITHU MAULI!! Vithu Mauli Kavita

विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी साद एक होता, भरली ती पंढरी एक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी…

कपाट (मनाचं) || KAPAT MARATHI KAVITA||

'मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं !! त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता येत नाही..!!या…

निषेध .!! पण कशाचा ???

एक पुतळा फुटला !! आणि अचानक मनातलं बोलला …! निषेध ..!!! पण कसला ?? पुतळा फुटला म्हणून !! अरे !!…

मैत्री || friendship Day Special || MARATHI ||

"हक्काने भांडावं असं कोणीतरी हवं असतं हक्काने बोलावं असं कोणीतरी जवळ लागतं कोणीतरी अलगद आपल्या जीवनात तेव्हा येत असतं मित्र…

उठावं || UTHAV MARATHI KAVITA ||

उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या कैक मुडदे आजही निपचित आहेत उगाच ऐकले आवाज ते सत्याचे आजही ते दगड निर्जीव पडून आहेत

कुटुंब || KUTUMB MARATHI POEM ||

नको पैसा , नको बंगला मला फक्त सुख हवं छोट्याश्या घरात माझ्या एक हसर कुटुंब हवं

बंद कवाडं !! Band Kawad Marathi kavita !!

घुटमळत राहिले मन तिथेच पण तू कधीं मुक्त झालीच नाही कदाचित तू त्या भिंतींना नीट कधी ओळखलंच नाही

बलात्कार || BALATKAR MARATHI POEM

सुरुवात होती या जगात माझी चूक नी बरोबर काही माहीत नव्हते माणुसकीच्या बुरख्यात येऊन राक्षस मला दिसले नव्हते

पांथस्थ || Panthast EK Kavita ||

वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची त्या सावलीतला मी एक पांथस्थ हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी पुढच्या प्रवासास मी आहे…

सत्य ..!! satya Marathi Poem ||

मी बंदिस्त आणि शांत जरी माझ्या मनाची शांती अटळ आहे या बंधांचे आज जणु खूप तुझ्यावर उपकार आहे हसून घे…

Next Post

आईचा वाढदिवस || AAICHA VADHDIVAS || MARATHI || BIRTHDAY ||

Sat Jul 16 , 2016
" आई आज वाढदिवस तुझाय!" ति म्हणाली " माहितेय रे मला!' मग तुझ काहीतरी सांग ना!!" त्यावेळी ती सहज म्हणुन गेली, " हे सगळंच माझय रे!!" बोलायला काहीच उरलं नव्हतं.