तिने त्याला सहजच मेसेज केला . त्याने तो पाहुन काहीच रिप्लाय न करता मोबाईल ठेवुन दिला. 5 मिनिटांनी पुन्हा मेसज तिचाच आला.
“अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!”
त्याने रिप्लाय केला,
“मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही! ” ..
आणि दोघांच संभाषण सुरु झालं. हळुहळु दोघांच बोलणं वाढलं.. सहज बोलन रोजच झालं. सकाळी गुड मॉर्निंग पासुन ते रात्री गुड नाईट पर्यंत बोलन चालु लागलं. दोघांच्या आवडी निवडी एकमेकांना कळु लागल्या. प्रत्येक चांगली वाईट गोष्ट तिला कधी सांगतोय अस त्याला वाटु लागलं .. आज दिवसभर काय घडल हे त्याला सांगावंस तिला वाटु लागलं. मेसेज नंतर फोनवर रोज बोलणं होऊ लागलं.. दोघांच एक छोटस जग तयार झालं, सहजच बोलणं त्याला प्रेम वाटु लागलं. पण तिला कस व्यक्त करावं हे मनातल सगळं म्हणुन तो रोज “तुला काहीतरी सांगायचंय मला!” अस म्हणुन पुन्हा “काही नाही, जाऊ दे!” अस म्हणुन टाळु लागला. तिलाही ते कळत होतं सहजच बोलणं आता सहजं राहिलं नव्हतं. त्यात प्रेमाची चाहुल लागली होती.
पण एक दिवस त्याचा फोन वाजला, त्याने फोन उचलताच कोणी एक बोलु लागला. मनाच्या पटलांवर जोरदार घात झाला. तिच्या प्रियकराने त्याला खुप काही सुनावलं होतं. तो ही सगळ निमुटपणे ऐकत होता. बोलायला काहीच राहिल नव्हतं. उरले होते ते फक्त मनातल्या प्रेमावर घात होऊन विस्कटलेले आठवणींचे तुकडे. ती सहज म्हणुन आली होती की सहजच बोलली होती. प्रेम आणि मैत्री यात गल्लत करुन तो कुठे चुकला होता का? ” की मला तुला काहीतरी सांगायचंय!” ते काय हे तिला कळुनही तिने ते अंतर जाणलंच नाही कधी.
तिचा प्रियकर होता ती निघुन गेली. नंतर 2 4 साॅरीचे मेसेजेस त्याला करुन ती विसरुनही गेली. मैत्री आणि प्रेम यातलं अंतर तरी काय असतं हे न सांगताच गेली. मग चुक ती कोणाची होती. सहजच म्हणुन सुरू झालेल हे तितकेस सहज नाही राहील हे तिला कळत होतंच ना. की फक्त बोलावंस वाटतं म्हणुन झालेला संवाद होता तो?. पण संवाद कुठेतरी थांबतो .. पण जिथे संवाद थांबतच नाही ते प्रेम असतं
कित्येक गोड गोष्टींच गाठोडं घेऊन तो शांत होता. ती निघुन गेली तरी तिच्यावर न रागावत तिच्या साठी जगतं होता. मनातल्या प्रेमाला शब्दात लिहितं होता .. आणि कवितेत तिला आपलंस करत होता .. ते प्रेम होतं की मैत्री याची गल्लत करत होता .. चुक तिची होती की माझी हे विसरूनही आजही तो तिच्यावरच प्रेम करत होता .. अगदी मनातुन.