"शब्द नाहीत सांगायला
  आई शब्दात सर्वस्व
  माया , करुना, दया
  तुझी कित्येक रूप!!

 मझ घडविले तु
  हे संसार दाखविले
  तुझ सम जगात
  दुसरे न प्रतिरूप!!

 निस्वार्थ तुझे प्रेम
  आई देवाची प्रतिमा
  तुझ चरणी मस्तक
  मझ विश्वची अनुरुप!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
Share This:
आणखी वाचा:  तु हवी होतीस || KAVITA SANGRAH||