"मनात माझ्या तुझीच आठवण
 तुलाच ती कळली नाही!!
 नजरेत माझ्या तुझीच ओढ
 तुलाच ती दिसली नाही!!

 सखे कसा हा बेधुंद वारा
 मनास स्पर्श करत नाही!!
 हळुवार पावसाच्या सरी बरसत
 तुलाच का भिजवून जात नाही!!

 उरली सांज थोडी पापण्यात
 तुलाच ती दिसली नाही!!
 त्या लाटांच्या आवाजात जणू
 तुलाच ती बोलली नाही!!

 घालमेल ही मनाची आज
 सांग तुला का कळत नाही!!
 माझ्या कित्येक अबोल शब्दांचे
 भाव तुला का कळत नाही!!

 विरून गेले क्षण माझ्यात
 ते पुन्हा का तुज दिसले नाही!!
 राहून गेली तू माझ्यात
 तुलाच का तू दिसली नाही!!

 पाठमोऱ्या तुला पाहताना मी
 तू मागे वळूनही पाहिले नाही!!
 पुन्हा भेटण्याचे वचन मज तेव्हा
 जाताना तू दिले नाही ..!!"

 ✍योगेश

*ALL RIGHTS RESERVED*