"एक गोड मावळती रेंगाळूनी तिच्या नजरेच्या कडात हरवूनी उरल्या कित्येक आठवणींत ती बोलकी एक भेट!! जणू ती अबोल न राहावी कित्येक शब्दात मज बोलावी उरल्या कित्येक भावनेत तिने शोधावा एक शब्द!! मी शांत सारे ऐकुनी तिच्यात जावे बेधुंद होऊनी ओठांवर तिच्या नजरेस अडवून पाहावे एक गोड स्वप्न!! सावल्यास जरा थांबुनी बोलावी सल मनातूनी विरहात तिच्या न द्यावा मनास कोणता एक भास!! नको ती वाट परतीची थांबवावी ती वेळ क्षणाची हात हातात तिचा घेताना जणू द्यावे एक वचन!! पुन्हा इथेच भेटण्याची वाट तिची इथेच पाहण्याची पाठमोऱ्या तिला जाताना पाहून मनात उरली फक्त एक सांजभेट..!!" ✍योगेश *ALL RIGHTS RESERVED*