भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !!
तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
नको म्हणता सांगावे की, मनात हा गोंधळ आहे !!
तू तिथे दिसावी अन्, मी इथेच थांबतो आहे !!
स्वतःस तेव्हा सावरून मग, वाट मी चालतो आहे !!
गंध चाफ्याचा दरवळतो की, स्वतःस का हरवतो आहे ??
क्षणात इथे क्षणात तिथे, खेळ कोणता चालतो आहे !!
कधी भास होऊन तू यावी, कधी मी आभास आहे !!
निघून जावे दूर देशी, नजरेत तुझे चित्र आहे !
रोज पहावे नजारे नवे, आठवणीत ती वाट आहे !!
रोज भेटावे नव्याने कोणा, हृदयात तरीही तूच आहे !!
सांग सखे प्रेम कसे ?? पुन्हा पुन्हा तिथेच आहे !!
वाटे आठवण यावी तुला, जिथे मी आजही आहे !!
विचारावे एकदा तरी तु, प्रेम माझ्यावर का आहे ??
क्षणही न दवडता मी, सगळं खर सांगणारं आहे !!
तुझ्याविणा जगतो जरी मी, तो क्षण अपूर्ण आहे !!
व्हावी सवय अशी की, एकांत तुझी सावली आहे !!
मुक्त फिरावे मी कुठेही, तू माझ्या सोबत आहे !!
अबोल तू अबोल मी , अबोल ते प्रेम आहे !!
अबोल त्या क्षणांत का ?? भेट आजही अधुरी आहे !!
©योगेश खजानदार
•ALL RIGHTS RESERVED•
आठवणीतल्या कविता