एक भींत आहे आता, तुझ्या आणि माझ्या मध्ये तू मला दिसत नाहीस, आणि तुलाही मी नाही!! तुझ्या डोळ्यातले अश्रू मला दिसत नाहीत!! आणि माझ्या चेहऱ्यावरचे भावही, तुला दिसत नाहीत!! आवाज ही तुझा मला ऐकू येत नाही!! आणि तुझ्या हृदयासही माझे बोलणे कळत नाही!! कारण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये जी आपल्याला पाहूच देत नाही!! अंतर मला तुझे कळले नाही, दुरावा माझा तू कधी पाहिला नाही!! भिरभिरणाऱ्या डोळ्यास आता, त्या खडकाशिवाय काही दिसत नाही!! एकांत बोलतो तुला माझ्या गोष्टी , माझ्याही स्वप्नातून तू जात नाहीस!! तरीही तुला मला बोलवत नाही , आणि माझेच मला शब्द बोलू देत नाहीत!! कारण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये जी आपल्याला बोलूच देत नाही!! कळतंय तुलाही तू राहू शकत नाही,!! उमगतयं मलाही तुझ्या विरहात मी जगू शकत नाही! श्वास प्रत्येक तुझा, माझेच नाव घेतल्या शिवाय राहत नाही!! आणि माझ्या जगण्याला, तुझ्या शिवाय अर्थ नाही!! पण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये जी आपल्याला भेटूच देत नाही!! कोणती सल तुझ्या मनात आहे, मला कळत नाही!! कोणते राग माझ्या मनात आहेत, तुला दिसत नाहीत!! विचारावे म्हटले तरी, तू बोलत नाहीस!! सांगावे म्हटले तरी ,मी ऐकत नाही!! समज गैरसमज यांच्यात नातेच टिकत नाही!! जोडावे म्हटले तरी, त्यास दोघेही भेटत नाहीत!! कारण , ती भिंत आहे तुझ्या आणि माझ्या मध्ये जी आपल्याला नातं कळूच देत नाही..!! ✍योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*