अबोल या नात्याची
 बोलकी एक गोष्ट आहे!!
 मनातल्या भावनेस
 शब्दांचीच एक साथ आहे!!

 नजरेस एक ओढ
 भेटीस आतुर आहे!!
 मिटल्या पापण्यात
 ओघळते अश्रू आहे!!

 मला सांग ना
 हे अंतर कोणते आहे!!
 तुझ्या विरहात
 कोणती हुरहूर आहे!!

 नकोस जाऊ दुर
 मनात एक सल आहे!!
 तुझ्या असण्याचे
 भास होत आहे!!

 शब्दांचीया सवे
 मी तुलाच शोधतो आहे!!
 अबोल या नात्यास तेव्हा
 पुन्हा बोलतो आहे!!

 येशील परतुनी तू
 हे शब्द सांगत आहे!!
 माझ्या सवे राहून
 तुलाच आठवते आहे!!

 कसे हरवले हे नाते
 वाऱ्यास पुसतो आहे!!
 आठवणीच्या या जगात तुला
 दाही दिशा शोधतो आहे!!

 अबोल या नात्याची
 बोलकी एक गोष्ट आहे !!!

 ✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RSERVED*
SHARE