|| आरती श्री व्यंकटेशाची ||
अघहरणी पुष्करणी अगणित गुणखाणी।
अगाध महिमा स्तविता न बोलवे वाणी।।
अखंड तीर्थावळी अचपळ सुखदानी।
अभिनव रचना पाहता तन्मयता नयनी।।
जयदेव जयदेव जय व्यंकटेशा।
आरती ओवाळु स्वामी जगदीशा।।
अतिसुखमय देवालय आलय मोक्षाचे।
नाना नाटकरचना हाटकवर्णाचे।।
थक्कितमानस पाहता स्थळ भगवंताचे।
तुळणा नाही हे भुवैकुंठ साचे।।
दिव्यांबरधर सुंदर तनु कोमल नीला।
नाना रत्ने नाना सुमनांच्या माळा।।
नाना भुषणमंडित वामांगी बाळा।
नाना वाद्ये मिनला दासांचा मेळा।।