व्यंकटेशाची आरती

शेषाचल अवतार तारक तूं देवा ।।
सुरवर मुनिवर भावें करिती तव सेवा ।।
कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा ।।
कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ।। १ ।।

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।।
केवळ करुणासिंधु पुरवीसी आशा ।। धृ ॰ ।।

हें निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तूतें ।।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांते ।।
देखून तुझे स्वरूप सुख अदभुत होते ।।
ध्यातो तुजला श्रीपति धृढ मानस होते ।। २ ।।

Share This:
आणखी वाचा:  श्रीगुरुचरित्र अध्याय ६ || Gurucharitr Adhyay 6 ||