"आभाळात आले पाहुणे फार, ढगांची झाली गर्दी छान!! पाऊस दादांनी भिजवले रान, रानात साचले पाणी फार!! मित्रांनी केला दंगा छान, कपडे भिजले आमचे फार!! कागदाची बनवली होडी छान, होडी बुडाली भिजुन फार!! चिखल झाला रानात छान, चिखलात पडले मित्र चार!! पाऊस दादां ही हसले फार, ढगांनी काढला फोटो छान!! सगळे खेळले पाऊसात फार, आईने केला चहा छान!! गरमा गरम भजे खात, खुदकन हसले मित्र छान!! कारण, आकाशात आले पाहुणे फार, ढगांची झाली गर्दी छान!! पाऊस दादांनी भिजवले रान, रानात साचले पाणी फार!!" ✍️योगेश *ALL RIGHTS RESERVED*