बाबा || BEST MARATHI POEM ||

"बाबा मनातल थोडं,
 आज सांगायचं आहे!!
 बस जरा थोडा वेळ,
 तुझ्याशी बोलायच आहे!!

 किती कष्ट करशील,
 हा संसार चालवशील!!
 माझ्या सुखासाठी का,
 दिनरात राबशील!!

 दोन घटका स्वतःसाठी,
 कधी न राहशील!!
 माझ्या स्वप्नांना,
 तुझ्या डोळ्यांत पाहशील!!

 काटकसर करून,
 मला भरपूर देशील!!
 स्वतः साठी मात्र,
 काही न घेशील!!

 रात्री उशिरा घरी,
 सकाळी लवकर जाशील!!
 आपली भेट न होताच,
 दिवस असेच जातील!!

 बाबा तुझ्या कष्टाचे,
 स्वप्न पुर्ण होतील!!
 मी जे घडलो,
 घडविणारा तु होशील!!

 बस जरा बाबा,
 थोड बोलायचं आहे!!"

 -योगेश खजानदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *