Father’s day special …
तुमच्या बद्दल लिहिताना
कित्येक विचार येतात बाबा!!
आणि प्रत्येक शब्द मला
कित्येक भाव सांगतात!!
माझ्या पहिल्या श्वासा सोबत
तुम्ही खूप बोललात ना बाबा!!
पण माझं बालपण आजही
तुमच्या कित्येक आठवणी सांगतात!!
कधी माझ्यासाठी करताना
किती कष्ट केले तुम्ही बाबा!!
आणि ते माझे कित्येक क्षण
तुमच्याच सोबत रमून जातात!!
माझ्या स्वप्नांना नेहमी
तुमच्या डोळ्यात पाहताना बाबा!!
पण माझ्या स्वप्नांना आजही
तुमचेच आदर्श असतात!!
मला घडवताना तुम्ही
स्वतःस झिजवलात ना बाबा!!
पण माझे यश आजही
तुमच्या शिवाय अपूर्ण असतात!!
किती लिहावे आज
तुमच्याच साठी बाबा!!
माझ्या कित्येक भावना तरी
अव्यक्तच राहतात!!
✍योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*