बाबा , नेहमीच मी सुखात राहावे म्हणून कष्ट करणारा !! प्रत्येक गोष्ट मला मिळवून देणारा, पण स्वतःसाठी काहीही न घेणारा !! तो माझा बाबा !! आई नंतर या जगात आपल्यावर खरंच कोणी प्रेम करत असेल तर तो म्हणजे बाबा!! कधीच चेहऱ्यावरून त्यानी मला प्रेम कळू दिलं नाही !! पण मनात प्रेमाचा सागर आहे असा माझा बाबा !!! आयुष्यभर फक्त माझ्याचसाठी झटणारा !! बाबा!! माझा बाबा !!
उसवलेला तो धागा कपड्यांचा कधी मला तू दिसुच दिला नाही मला नेहमीच नवीन कपडे घेतले पण स्वतःसाठी एकही घेतला नाही!! स्वप्नांच्या या दुनियेत चालताना तू कधीच स्वतःकडे पाहिले नाही माझ्या स्वप्नांच्या दुनियेत येऊन रमल्या शिवाय राहिला नाही!! बाबा!! किती रे तुझी ती धडपड मला तु कधीच कळू दिली नाही दिवसभर काम करून आलेला थकवा सुधा जाणवू दिला नाही!! आयुष्याचं गणित सांगताना कधीच तू चुकला नाही पण मी जिथे जिथे चुकलो असेल तिथे सावरल्या शिवाय राहिला नाही!! मनात तुझ्या किती ते प्रेम कधीच तू कळू दिले नाही यशाच्या मार्गावर कठोर होताना क्षणभरही तू विचार केला नाही!! सारे आयुष्य खर्ची करून स्वतःकडे काहीच ठेवले नाही माझ्यासाठी जगताना बाबा तु स्वतःसाठी एक क्षणही जगला नाही !!! ✍️© योगेश खजानदार