"बाबा म्हणारी ती राजकुमारी
 एवढी लवकर का मोठी व्हावी
 तिच्या आयुष्यात राजकुमार यावा
 आणि या राजाची झोप का उडावी!!

 कधीतरी जायचंच होतं तिला
 ती वेळही आज लवकर का यावी
 तिच्या सवे घालवलेल्या क्षणांची
 तिने त्यास एक भेटच आणुन द्यावी!!

 थांब रे राजकुमारा थोड
 राजाची ही विनंती तु ऐकावी
 राजकुमारीच्या या बाबांची आज
 मनाची घालमेल का व्हावी!!

 ही गोड परी आठवणीत माझ्या
 स्वप्नातल्या घरात आज का रहावी
 तुझ्या सवे जाताना तिची
 पाऊले बाबांनाकडे आज का वळावी!!

 लहान होऊन राजकुमारी ही आता
 राजास या मिठी का मारावी
 बाबा बाबा म्हणताना आता
 ती पुन्हा का लहान होऊन जावी!!

 राजकुमार घेऊन गेला परीस त्या
 आठवणीत ती राजाच्या सतत का रहावी
 आणि बाबा म्हणारी ती राजकुमारी
 एवढी लवकर मोठी का व्हावी.. !!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE