सुरुवात होती या जगात माझी चूक नी बरोबर काही माहीत नव्हते!! माणुसकीच्या वेशात येऊन राक्षस मला दिसले नव्हते!! स्त्रीचं शरीर म्हणजे भोगायची गोष्ट तेवढच यांना माहित होते!! माझ्या कवळ्या शरीराची लालसा एवढच त्यांनी पाहिले होते!! मी ओरडत होते ,रडत होते!! कित्येक वेदनेने विव्हळत होते!! पण त्या राक्षसी मनाला तेव्हा वासने शिवाय काहीच दिसत नव्हते!! अत्याचार झाला माझ्यावर जिवंत मला मारले होते कोण त्या मेलेला समाजातील लोक जाती धर्मात मला वाटून घेत होते!! कित्येक नात्याची आता लाज वाटते!! वयाच आता त्यांना भान नव्हते!! ज्या समाजात स्त्रीला मान नाही!! तिथे जिवंत राहून काय करायचे होते!! कित्येक वेळा वासनेने या जगात!! माझ्यासारखे बळी घेतले होते!! निर्भया,कोपर्डी या माझ्या बहिणींचे कित्येक आक्रोश समाजास बोलत होते!! कुठे मेणबत्ती लावली होती!! कुठे दुःख वाटत होते!! बदल झालाच पाहिजे असे काही लोक म्हणत होते!! किती दिवस आठवणीत राहील मी मला काहीच माहीत नव्हते!! कदाचित मला न्याय न मिळताच असेच विसरून जायचे होते!! मी गेले सोडून माझ्या आई बाबांना एवढंच दुःख मला वाटतं होते बलात्कार म्हणजे काय असतो कळायचा आत वासनेची शिकार झाले होते!! सुरुवात होती माझी या जगात चूक की बरोबर काहीच माहीत नव्हते!!! © योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
