"बरंच काही बोलताना ती स्वतःत नव्हती!! हरवलेल्या आठवणीत खोलं क्षणात होती!! विखुरलेल्या मनात कुठे दिसत नव्हती!! माझ्या सावलीस शोधताना स्वतः अंधारात होती!! बरंच काही बोलताना ती अश्रु मध्ये होती!! भारावलेले मन घेऊन डोळ्यात पाहात होती!! माझ्या जवळ येऊन माझ्या मनात होती!! हात हातात घेऊन मला आपलंस करत होती!! बरंच काही बोलताना ती वचन मागत होती!! विरहाच्या क्षणात मला शोधत होती!! आयुष्यभराची साथ मला मागत होती!! ह्रदयात ती माझ्या पुन्हा साद देत होती!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
बरंच काही बोलताना… !! || AVYAKT PREM KAVITA || MARATHI ||
