भाग १
“आज कित्येक वर्ष निघून गेली !! पण ते बंधन आजही तसच का आहे?? हेच मला कळले नाही !! या पलंगावर पडून कित्येक दिवस असेच गेले !! त्या फिरणाऱ्या गोल चाकांचा काय तो आधार मला !!! पण एवढं सगळं असूनही पुन्हा आजारपणाची भर !! कदाचित त्या देवालाही मला स्वतः कडे बोलावण्याची घाईच झाली आहे !!!” विशाल मनातलं लिहीत होता.
” प्रितीला भेटून कित्येक वर्ष लोटून गेली !! उरल्या शेवटच्या आठवणीत आजही दिवस सरतात !! तिच्या मागच्या वर्षी लिहिलेल्या ‘ मनाची काहूर !’ या पुस्तकाची पाने वाचून मन भरून येत !! ती मला आजही विसरली नाही, याचंच कौतुक वाटत !! तिच्या आजपर्यंतच्या प्रत्येक लिखाणाचं कौतुक केलं मी !! आवर्जून पत्र लिहिली !! पण वेगळ्या नावाने !!! ” विशाल लिहिता लिहिता थांबला.
एक अश्रू त्या वहीच्या पानावर पडला आणि कदाचित लिहिण्याच थांबवावं अस विशालला सांगून गेला.
“मारिया !! ” जोरात विशाल ओरडत होता.
“मारिया !! ” त्या एवढ्या मोठ्या घरात त्याचा आवाज घुमत होता.
लांबून कोणीतरी पळत येतं आहे याचा आवाज झाला. मारिया विशालच्या खोलीत आली आणि बोलु लागली.
“काय पाहिजे विशाल ?” पन्नास साठ वर्षाची ती मारिया एकटक विशालकडे पाहत होती.
“मला बाहेर घेऊन चल !! ” विशाल डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होता.
“विशाल बेटा , आज पुन्हा प्रितीची आठवण झाली ?” मारिया विशालची नोकर, पण अगदी विशालच्या जवळची होती. कित्येक वर्ष विशालकडे काम करत होती. अगदी विशालच्या आईसारखी होती.
“नाही मारिया !!अस काही नाहीये !!”
“विशाल बेटा !! किती वर्ष झाली ओळखते मी तुला !! मनातलं असंच मनात ठेवायची सवयच आहे तुला!! ” मारिया विशालला एका बाजूने उचलत खुर्चीवर बसवत होती. विशालही तिला आता मनातलं सांगु लागला.
“आज मी पुन्हा प्रितीला पत्र लिहिलं मारिया !! आणि त्यात तिला म्हटलं की कदाचित हे माझं तुला शेवटचं पत्र असेल !! पण अखेर पर्यंत तुझे शब्द माझ्या सोबत राहतील !! ” विशाल त्या व्हीलचेअर वर बसून बाहेरच्या मोकळ्या जागेत आला. मारिया शेजारीच बसून होती.
“कसं असतं बघ ना मारिया !! ती प्रिती आजही माझ्यावर किती प्रेम करते !! पण मला तिच्याकडे जायला या बंधनातून कधीच सुटका मिळत नाही !! आणि मला माझ्या या परिस्थितीची जाणीवही तिला कधीच करून द्यायची नाही !! ” विशाल समोरच्या बुडत्या सूर्याकडे पाहत म्हणाला.
“पण का ?” मारिया अगदिक होऊन बोलु लागली.
“कारण आपण काही वाईट स्वप्ने कधी पहिलीच नाहीत असं म्हणायचं आणि पुढे जायचं !! मारिया, तिच्या मनात आजही माझ्याबद्दल प्रेम आहे !! मी तिच्यापासून दूर गेलो यात काहीतरी कारण नक्की असणार हे तिलाही माहीत आहे !! पण ते कारण कळू नये असंच मला वाटतं !!” विशाल व्हीलचेअरकडे पाहत म्हणाला.
“पण मला माझ मन सांगत !! ती तुला नक्की शोधत येणार !! ” मारिया विशालच्या मागे उभा राहत म्हणाली.
“ती वेळ कधीच येऊ नये असं मला वाटतं !! ” विशाल आणि मारिया कित्येक वेळ तिथेच थांबले.
विशालच्या अपंगत्वाचा तेवढा एकच आधार होता. मारिया !! त्याच्या आयुष्यात बाकी काहीच राहिले नव्हते !! उरल्या होत्या काही आठवणी आपल्याच लोकांच्या!! पण त्याही काहीच दिवस!!
विशाल पुन्हा त्या पलंगावर पडून राहिला. मारिया त्याला तिथे झोपवुन निघुन गेली.
“श्वास कदाचित आता मोजत असतील, शेवटचेच आपले क्षण !! पण मी त्यांना सांगणार आहे !! दोन क्षण थांबा, मला माझ्या प्रितीचा चेहरा शेवटचा एकदा माझ्या नजरेत आणु द्या !! अगदी अखेरचा !! ही विनवणी तुम्हाला !! ” विशाल पलंगावर पडून होता. मनात कित्येक विचार होते.
“माझं शरीर जरी पंगू झालं असलं तरी माझ मन प्रितीला रोज भेटत !! कित्येक वेळ ते चालत चालत जात दूर त्या डोंगरात तिच्या सवे !! पाहत बसत मावळती!! आणि तिच्या नजरेतील मी !!मग हळूच घेत तिच्या गालांच चुंबन आणि धावत माझ्याकडे येत !! मन खूपच तिच्यावर प्रेम करत !! ” रात्रीच्या त्या एकांताचा वेळी विशाल आपल्या मनाशीच कित्येक वेळ बोलत होता.
ते घड्याळ मात्र सारखं टिक टिक करत होत. विशालला आपल्या स्वतःची जाणीव करून देत होत. ती रात्र तिच्या आठवणीत किती सुंदर वाटते ना. असे विचारत होत!
“पण प्रिती तुझी साथ आजही आहे !! तुझ्या शब्दांची !!या रात्रीच्या शांततेस भंग करायला तुझ्या कवितेच्या त्या ओळी मला साथ देतात!!
“मज पाहिजे सख्या तुझीच साथ
या आठवांचा मज होतो जाच
नकोस देऊ तू दुरावा मज आता
तोडून बंधने, घे मला कवेत
सांग त्या अंधारास तू काही
नकोस करू क्षणाची घाई
ठेव काही क्षणांस जपून तू
मज आहे तुझ्या भेटीची आस
हो! तू आहेस प्रत्येक श्वासात
माझ्या मनातल्या प्रत्येक घरात
त्या श्वासास ओळख तुझी होताच
उरलास फक्त तू या हृदयात!!! “
अखेर उरलो फक्त मी या एकांतात !!! ” विशालचा आवाज साऱ्या घरात घुमला !!