Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » कथा

बंधन || कथा भाग ४ || LOVE STORY MARATHI ||

Category कथा
बंधन || कथा भाग ४ || LOVE STORY MARATHI ||

Content

  • भाग ४
  • क्रमशः
Share This:

भाग ४

“तुझ्यासाठी कित्येक कविता लिहिल्या विशाल !! माझ मन मला सांगत होत, तू कुठेतरी नक्कीच वाचत असणार!! पण ते असं !! याचा कधीच विचार मी केला नाही. तुझ्या आयुष्यात पुन्हा यावं !! एक प्रेयसी म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून यावं !! एवढीच इच्छा होती माझी!!” प्रिती विशाल समोर व्यक्त होत होती.

“पण .. ते … अस भेटावं .. अस मला ..ही नको होत!! ” विशाल हळू आवाजात प्रितीला बोलू लागला. बोलताना त्याला श्वास घेताना त्रास होऊ लागला.
हे सगळं पाहून प्रिती त्याला सावरायला पुढे आली. मारिया बाहेर विशालसाठी पाणी आणायला गेली.

“तू गेल्या नंतर कित्येक दिवस मला काहीच सुचत नव्हते!! आई आणि बाबांनी नंतर लग्नासाठी हट्ट धरला, आणि लग्न केले. पण त्या नंतरही मला तुला विसरण अवघड होतं. पण संसार मात्र चांगला केला. आपल्या प्रेमाचं दुःख संसारावर पडू दिलं नाही. तुझ्या आठवणी होत्याच सोबत , नंतर लिखाणाला सुरुवात केली. तुला तिथे जपलं , माझ्या जवळ ठेवलं. अगदी कायमचं!! ” प्रिती विशालला खूप काही सांगु लागली.

तेवढ्यात मारिया खोलीत आली. पाण्याचा ग्लास प्रितीकडे देत ती म्हणाली.
” पाणी !!!”
प्रिती मारियाकडे पाहत पाण्याचा ग्लास घेत विशाल जवळ आली. विशालला मानेला अलगद आधार देत थोड उठवत पाणी पाजू लागली. पण पाणी पिताच विशालला खोकला लागला.
“हळू !!” प्रिती.
“मारिया , तुला आठवत !! जेव्हा तू आम्हाला पहिल्यांदा सोबत पाहिलं होतस तेव्हा काय म्हणाली होतीस!!”
प्रिती ग्लास तिच्याकडे देत बोलू लागली.
“आठवत ना !! ” मारिया थोड स्मित करत म्हणाली.

“पण बघ ना !! आज मात्र मी तशी नाहीच !! खूप काही बदल झाला आता !!” प्रिती.
तेवढ्यात विशाल काहीतरी बोलू लागला. मारिया आणि प्रिती त्याच्याकडे पाहत होत्या.
“मी तरी… कुठे .. आता तसा … राहिलो… मीच मला हरवून गेलो !! या बंदिस्त खोलीत हरवून गेलो …. हरवून … गेलो… !! ” विशाल स्वतः ला सावरत म्हणाला.
“गप्प बस !! उगाच ….!!” प्रितीला पुढचं बोलवेना. ती खोलीतून बाहेर गेली. तिच्यामागे मारिया ही आली.
“मारिया !! मला खर खर सगळं सांग !! विशालची ही अवस्था का झाली. तो असा अंथरुणाला खिळून का आहे??? सांग मारिया !!” प्रिती मारियाल विचारू लागली. कित्येक अश्रू तिला बोलू लागले.
“प्रिती !! कस सांगू !! विशाल !!! ” मारिया खोलीकडे पाहू लागली.
“मारिया !! त्याला मी काही बोलत नाही!!”
मारिया आता प्रितीला सगळं सांगायचं या निर्धाराने बोलू लागली.
“तुझ्या आणि विशालच्या प्रेमाला खरंतर तुझ्या बाबांनीच वेगळं केलं प्रिती !!”
हे ऐकताच प्रिती प्रश्नार्थक मुद्रेने मारीयकडे पाहू लागली आणि म्हणाली.

“माझे बाबा !! कसे काय !! आणि विशालच्या अवस्थेला ते कसे जबाबदार ??”
“तुला भेटायचं म्हणून विशाल त्या दिवशी घरातून बाहेर पडला. पण तुला भेटायच्या आधी त्याला तुझ्या बाबांची भेट झाली. त्यांचा तुमच्या या नात्याला विरोध होता. विशालने खूप प्रयत्न केला त्यांना समजावण्याचा पण ते नाहीच समजू शकले. बोलताना तुझ्या बाबांचा राग अनावर झाला आणि !!!” मारिया बोलता बोलता थांबली.
“पुढे काय मारिया !! ” प्रिती अगदिक होऊन म्हणाली.
“पुढे जे झाल ते तू पहातेच आहेस !! तुझ्या बाबांनी रागात विशालला धक्का दिला !! रस्त्याच्या कडेला उभे असलेले हे दोघे, पण तुझ्या बाबांच्या धक्क्याने विशाल रस्त्याकडे फेकला गेला . रस्त्यावरून जाणारे वाहन विशालला धडकले!! आणि त्याला त्यात त्याचे दोन्ही पाय गमवावे लागले!!” मारिया डोळे बंद करून ते सगळं बोलू लागली.

“नाही मारिया !! हे सगळं खोटं आहे !! “
“पहिल्यांदा मलाही हे खरं वाटलं नाही !! पण जेव्हा तुझे बाबाच त्याला दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा त्यांनीच मला हे सगळं सांगितलं.!! त्याची चूक झाली अस ते म्हणाले !!” मारिया.
प्रिती हे सगळं ऐकून सुन्न झाली. तिला काय बोलावं तेच कळेना. कित्येक क्षण दोघीही शांत होत्या. मारिया पुन्हा बोलू लागली.
“हे सगळं घडल्या नंतर तुझे बाबा रोज विशालकडे येत होते !! आपल्या केलेल्या चुकीची माफी मागायला. पुढे आज कित्येक वर्ष या खोलीत तो पडुन आहे !! त्यामुळे कित्येक आजारांनी त्याला त्रस्त केलंय!!”
“पण बाबांनी हे केलं ! माझ्या प्रेमाला अशी शिक्षा का? प्रेम मीही केलं होत !! मग त्याची शिक्षा मला द्यायची !! ” प्रिती मनातलं बोलू लागली.

तेवढ्यात खोलीतून आवाज आला. प्रिती आणि मारिया दोघीही पळत खोलीत गेल्या.
“विशाल !! विशाल !! ” प्रिती विशालच्या जवळ जात बोलू लागली.
“मारिया !! विशालला दवाखान्यात घेऊन जाऊयात का?”
मारिया काहीच बोलली नाही. ती फक्त पाहत होती.
“तुला .. शेवटचं .. पहायचं .. ही एकच .. इच्छा होती माझी !! पण तेही माझ्या … आठवणीतून .. तू मला कधी … पुन्हा … भेटूच नये … असच वाटायचं … ” विशाल अडखळ त बोलत होता.

“का ?! माझ्या लिखाणावर प्रेम केलंस !! मग ती पत्र पाठवलीस !! निरंजन म्हणून पाठवलेलं प्रत्येक पत्र मला निरंजनाचा नाही ,तुझ्या प्रेमात पाडत होत !! पुन्हा पुन्हा!! मी फक्त तुझ्याच सारखा अजून कोण आहे हेच पाहायला आले होते !!” प्रिती विशालच्या हात हातात घेत म्हणाली.
विशाल फक्त हसला. तिचा हात घट्ट पकडत तो बोलू लागला.

“तुझ्या लिखाणाने … मला तू… माझ्यापासून … दूर .. आहेस असं .. कधी .. वाटलच नाही … !! न. .. राहवून मी तुला ….. पत्र लिहायचो….! मला तुझ्या त्या … चार .. ओळी खूप .. आवडतात….. पहिल्या … पावसाच्या …. सरी “
प्रिती पुढे त्या ओळी म्हणू लागली.
“पहिल्या पावसाच्या सरी
हळुवार भिजली ती माती
त्या मातीच्या वासात जणू
आठवांचा गंध गवसला
तुझ्या असण्याची ती जाणीव
प्रत्येक थेंबात तुला शोधून
त्या थेंबात जणू मज तेव्हा
तुझाच चेहरा पुन्हा दिसला
कश्या पुन्हा नव्याने आता
त्या वेली जणू बहरल्या
साऱ्या हिरवळती जणू मज
नव्याने मज तू भेटला
दाटून आल्या आभाळी
ढगांच्या कित्येक लहरी
हळुवार वाऱ्यासवे तेव्हा
जणू तूच सख्या, पुन्हा बरसला
अगदी मनसोक्त !!!” प्रिती डोळ्यातले अश्रू पुसत शांत झाली. क्षणभर ती स्वतःलाही हरवून बसली भानावर येताच ती विशालकडे पाहू लागली. विशाल शांत होता .
“विशाल !!! विशाल !!! ” प्रिती विशालकडे पाहून बोलू लागली.

क्रमशः

बंधन || कथा भाग ३ ||
बंधन || अंतिम भाग ||

Yogesh Khajandar

Author || Content Writer || Blogger ||

Tags आठवणी katha preamachi marathi rochak katha

RECENTLY ADDED

वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

a couple in their wedding photography

विरहं || LOVE || MARATHI || POEM ||

ठरवुन अस काही होतंच नाही मनातलेच मन कधी ऐकत नाही नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही आसवांनाही कधी निटस विचारत नाही कित्येक दुख डोळ्यातुन वाहत नाही
भीमाशंकर ज्योतिर्लिंग, खेड, पुणे महाराष्ट्र

अनादिकल्पेश्र्वर स्तोत्रम् || Devotional ||

कर्पूरगौरो भुजगेन्द्रहारो गङ्गाधरो लोकहितावहः सः । सर्वेश्र्वरो देववरोऽप्यघोरो योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ १ ॥ कैलासवासी गिरिजाविलासी श्मशानवासी सुमनोनिवासी । काशीनिवासी विजयप्रकाशी योऽनादिकल्पेश्र्वर एव सोऽसौ ॥ २ ॥
romantic couple hugging in park at night

प्रेमरंग || PREMRANG || POEM ||

प्रेमाचे कित्येक रंग , मनातले ओठांवर यावे
red heart shape in a white surface

दिल || DIL || HINDI || POEMS ||

कुछ भी नही था ये दरमियाँ कैसे ये प्यार तुझसे हो गया!! अब तो रात भी तेरी ये दिन भी तेरा हो गया!!
Dinvishesh

दिनविशेष २४ जून || Dinvishesh 24 June ||

१. दुसऱ्या महायुध्दात फ्रान्स आणि इटलीमध्ये शस्त्रसंधी झाली. (१९४०) २. टांझानिया येथे झालेल्या रेल्वे अपघातात २००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००२) ३. आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची नौका आधुनिकीकरण झाल्या नंतर पुन्हा सेवेत दाखल झाली. (२००१) ४. मोहम्मद मोसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१२) ५. सौदी अरेबियात स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आली. (२०१८)

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest