भाग ३
विशाल आता अस्वस्थ झाला होता. प्रिती त्याला भेटायला येणार हे कळल्या पासून त्याच मन कशातच लागतं नव्हते.
“तुझ्या शब्दाचा आधार होता प्रिती मला !! पण मनात असूनही तू मला कधी भेटूच नये असच वाटलं मला!! कदाचीत माझा स्वार्थ असेल यामध्ये !! किंवा स्वतःला तुझ्यापासून लपवण्याची ही धडपड !! माझी ही अवस्था का झाली हे सांगण्याची ताकद माझ्यात नाहीये !! ” विशाल मनात कित्येक विचार करत होता.
विचारांच्या तंद्रीत विशाल झोपी गेला. रात्रभर मारिया त्याच्या जवळच बसून होती. विशालची तब्येत नाजूक होत होती.
“बाळ विशाल !!” मारिया बसल्या जागीच झोपून गेली होती. उठल्या उठल्या तिने विशालला हाक दिली.
विशाल किंचित डोळे उघडून मारियाकडे पाहू लागला.
“मी डॉक्टरांना बोलावते !! ” मारिया उठून बाहेर जाऊ लागली.
तेवढ्यात विशालने मारियाला नकारार्थी मान हलवली.
“आजार वाढलाय विशाल! ” मारिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलू लागली.
पुसट अश्या आवाजात विशाल हळू बोलू लागला.
“प्रि.. ती.. !!” विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
“भेटायचं ना ??” भरल्या आवाजात मारिया बोलत होती.
विशालने फक्त होकारार्थी मान हलवली. मारिया कित्येक वेळ तिथेच बसून आसवे गाळत होती. विशालची ही अवस्था तिला पाहवत नव्हती. तिने विशालचा विरोध असतानाही डॉक्टरांना बोलावले. पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. डॉक्टरांनी परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं. अशात कित्येक दिवस गेले. रोजचा दिवस फक्त कित्येक आठवणी घेऊन येत होता. विशाल अडकत अडकत बोलू लागला होता. पण परिस्थिती नाजूक होती. मारियाला फक्त विशाल नीट व्हावा एवढचं वाटत होत. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात कोणीच नव्हते. कसाही असला तरी तो तिच्यासाठी आधार होता. रक्ताचा नसला तरी मुलापेक्षा कमी नव्हता.
“माझे श्वास आज माझ्याशीच का भांडत आहेत !! आठवणीतल्या तुला माझ्या नजरेसमोर आणत आहेत!! पण तू येणार, तुझ्या निरंजनाला भेटायला येणार म्हणून कदाचित ते श्वास त्या विधात्याला थोड्या अजून क्षणाची भीक मागत आहेत !! तो निष्ठुर नाहीये !! खऱ्या प्रेमाची त्यालाही कदर आहे !! तो नक्कीच माझ्या श्र्वासांच गाऱ्हाणं ऐकेल !! ” विशाल श्वास आणि क्षण यातील अंतर पाहत होता. स्वतःतच गुंतला होता.
“कित्येक वर्षांपूर्वी विशालला भेटण्याची ओढ अशीच होती मला !! त्या बागेत कित्येक वेळ मी त्याची वाट पाहिली!! पण तो आलाच नाही !! पुन्हा ना त्याच कधी पत्र आले!! ना कधी त्याने मला भेटायला बोलावलं. पण मी त्याला दोष देणार नाही , कधीच नाही !! माझा विशाल असा कधीच नव्हता!! आणि नाहीच !! त्याच्यासाठी लिहिलेल्या कित्येक कविता कथा यांचे भाव, ते लिहीत असतानाचे माझे विचार, अचूक कोणी ओळखले असतील तर ते निरंजन ने !! ” प्रिती आज निरांजानाला भेटायला निघाली होती.
“आयुष्याची कित्येक वर्ष या पोराने इथेच या खोलीत काढली. ना कोणी येत भेटायला , ना कोणी जात !! फक्त त्याच्या आठवणींची काय ती सोबत त्याला!! आयुष्य कुठेतरी चांगलं जात होत तेव्हा नशिबाने सारेच हिरावून घेतले!! पण नियती कदाचित हसून म्हटली असेल, थांब अजून तुला तिला पहायचं आहे !! आणि म्हणूनच कदाचित प्रिती त्याला पाहायला येते!! पण गॉड, माझ्या या पोराला तिला भेटू दे !! प्रितीची आणि त्याची भेट लवकर होऊ देत !! ” मारिया स्वयंपाक घरात देवाला प्रार्थना करत होती.
तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला. मारिया पटकन बाहेर गेली. एक सुंदर स्री समोर उभी होती. मारिया समोर येताच ती बोलू लागली.
“हे निरंजन देशमुख यांचच घर ना ??” मारियाने क्षणात प्रितीला ओळखलं.
ती काहीच न बोलता प्रितीला आत येण्यास खुणावत होती. प्रिती घरात येताच तिलाही थोडे नवल वाटले. तिथे समोरचं तिने लिहिलेले पुस्तक ठेवले होते.
“आपण चहा घेणार की कॉफी?” मारिया पाण्याचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाली.
“नाही !! काही नको मला!! मला खरतर निरंजन यांना भेटायचं होत !! ते आहेत का ?? मी प्रिती सरदेसाई!!” प्रिती मारियाकडे पाहून बोलू लागली.
“हो भेटतील ना!! ” मारिया डोळ्यात आलेले पाणी लपवत म्हणाली आणि पुढे म्हणाली.
“चला माझ्या सोबत !! “. मारिया असे म्हणताच प्रिती तिच्या मागे जाऊ लागली.
खोलीचा दरवाजा उघडताच प्रिती आणि मारिया खोलीत आले. पलंगावर पडलेल्या विशालकडे पाहताच प्रिती निशब्द झाली. डोळ्यातले अश्रू अगदी मनसोक्त वाहू लागले. प्रिती विशालला बिलगली.
“विशाल ??” तिच्या चेहऱ्यावरचे कित्येक भाव बदलले.
“हो विशालचं!! प्रिती तू ज्याला निरंजन समजतं होतीस तो तुझा विशालच आहे !!” मारिया तिला सावरत बोलू लागली.
“हे काय झालं तुला विशाल!!तुझी ही अवस्था आणि मला काहीच माहीत नाही !!अस का केलस तू?? तुला मला कधी भेटावसं वाटलं नाही, की तुला अस पाहून मी तुला दुरावेल अस वाटलं ?? का विशाल??? का लपवलसं सार हे माझ्यापासून?? ” प्रिती कित्येक मनातले भाव बोलत होती. आपल्या मनातल सांगत होती. बोलत होती.
“मला……!! माफ … कर !!” विशालच्या या तुटक बोलण्याने प्रिती शांत झाली.
मारिया प्रितीला खोलीतून बाहेर घेऊन आली. प्रितीला सावरत ती तिला खूप काही सांगू लागली.
“पण मारिया !! हे कस आणि कधी झालं ?? माझा विशाल असा कधीच नव्हता !! आज त्याची ही अवस्था पाहून मला खरचं कळत नाहीये काही !!” प्रिती अगदिक होऊन बोलू लागली.
“हे कधी आणि का झालं !! हे काहीच आता विचारू नकोस प्रिती !! कदाचित विशालला तुझी आता जास्त गरज आहे !!” मारिया आपला हुंदका दाबत म्हणाली.
“त्याच्याकडे जास्त वेळ नाहीये !! “
असे म्हणताच प्रिती कित्येक वेळ आपले अश्रू गाळत राहिली. आत विशाल जवळ येत ती बोलू लागली.
“तुला बरं व्हायचं आहे !! माझ्यासाठी !!” प्रिती विशाल जवळ बसली.
विशाल तिच्याकडे पाहून गालातल्या गालात हसला. तिच्या शेजारी ठेवलेल्या तिनेच लिहिलेल्या पुस्तकाकडे पाहून फक्त तुटक बोलण्याचा प्रयत्न करू लागला.
“क.. वि..ता!!!” प्रिती त्याला काय म्हणायचं आहे ते पाहू लागली.
प्रिती ते पुस्तक उचलत म्हणाली.
“यातली कविता ?? वाचु???”
विशाल होकारार्थी मान हालवुन हो म्हणाला. प्रिती ते पुस्तक उघडून त्यातली एक कविता म्हणू लागली.
“सावरले ते क्षण कालचे
तुझ्या विरहाने भिजले जरासे
मज एक भेट हवी तुझी
सांग त्या मनास तू जरासे
थांबली वाट ,भीक या श्र्वासांची
झुळूक विचारते हे कोणते गंधही
सांग कधी भेट होईल सख्या
तुझ्या विरहात भान न कशाचे
उरलास तूच फक्त माझ्यात
कित्येक आसवात आणि श्वासात
मी वाट पाहील तुझी अखेर पर्यंत
उरले मागणे हेच अखेरचे …!!”
प्रिती स्वतःचे अश्रू अवरत होती. पुस्तकं मिटून ती कित्येक वेळ विशाल जवळ बसून त्याला बोलत होती.