बंगला नंबर २२ || कथा भाग ५ || वासना || मराठी कथा ||

कथा भाग ५ || वासना ||

“वासना आणि प्रेम यात किती फरक असतो ना ?? काल श्रीधरच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल प्रेम दिसत होत त्याच्या मिठीत मला सगळं जग सामावल्या सारखं वाटतं होत. पण त्याचा तो नीच साहेब त्याच्या नजरेत मला फक्त वासना दिसली. माझ्या शरीराला फक्त भोगायची वासना. मी अजूनही गप्प आहे पण किती वेळ गप्प बसेल सांगता येणार नाही. माझ्यातील सहनशक्ती संपली की त्याचा उद्रेक होईल आणि कदाचित सगळंच संपून जाईल. पण मग माझ्या श्रीधरच काय होईल ?? माझ्या सायलीच काय होईल ?? खरंच कोणत्या पेच प्रसंगात मी पडले आहे हेच मला कळत नाही. मी फक्त श्रीधरची आहे आणि माझ्यावर फक्त श्रीधरचा अधिकार आहे हेही सत्य त्या नीच माणसाला कळायला हवं. पण वासणेत बुडालेल्या त्या नीच माणसाला कस कळणार हे !! आणि कोण सांगेन !! ” प्रिया एकटीच हॉलमध्ये सोफ्यावर बसून विचारात बुडाली होती. तिच्या मनातून काही केल्या तो रात्रीचा प्रसंग जात नव्हता.

“ताईसाहेब !! ताईसाहेब !!” मध्येच नंदा तिला हाक मारते.
दोन तीन हाक मारल्या नंतर प्रिया भानावर आली.
“काय हवंय नंदा ??”
“मला थोड बाहेर जायचं आहे !! येऊ का जाऊन ??”
“आता एवढ्या दुपारी ??”
“हो !! माझ्या पोराच्या शाळेत भेटायला बोलावलं आहे !! यांना जा म्हटलं तर !! सकाळपासून कुठ गायब आहे हा माणूस माहीत नाही !!”
” जाऊन ये ! असही आता काही काम नाही !! “

नंदा घरातून बाहेर पडली. प्रिया सायली सोबत गप्पा मारत बसली. तेवढ्यात पुन्हा दरवाजा जोरात वाजल्याचा आवाज झाला. प्रिया धावतच हॉलमध्ये आली. पाहते तर समोर पुन्हा देशमुख साहेब आले होते. त्यांना पाहून ती घाबरली. मागे सरकत बोलू लागली.
“तुम्ही इथे ?? या वेळेला ??”
“हो !! आलो होतो असच !! तुला बोलल्या शिवाय करमत नव्हतं!! म्हणून आलो धावत पळत.”
“श्रीधर नाहीयेत घरी! तूम्ही नंतर या !!”
“माहितेय मला !! ऑफीसला गेलाय ते !! त्यालाच बोलून आलो आता !! म्हणालो आलो जरा महत्त्वाचं काम करून ” देशमुख साहेब मोठ्याने हसला.
“काय हवंय तुम्हाला ??”
“मला तू हवी आहेस ??” देशमुख साहेब पुढे येत म्हणाला.
“अस काय करताय साहेब तुम्ही !! प्लिज तुम्ही इथून जा !!”
“नाही !! आज तर जाणारच नाही !! ” साहेब असे म्हणताच खोलीचा दरवाजा जोरात आदळला.
“मी तुमच्या पाया पडते!! प्लीज तुम्ही इथून जा !! तुम्ही श्रीधरचे साहेब आहात म्हणून नीट सांगतेय !!” प्रिया थोडी रागात येत म्हणाली.
“नाही तर काय ??” देशमुख साहेब रागात समोरचे ग्लास जमिनीवर आदळत म्हणाले.
“नाहीतर मी माझा जीव देईन !!” जवळच असलेला चाकू हातात घेत प्रिया म्हणाली.
” लागेल तो !! ठेव खाली !! ! लागेल म्हटलं ना !!”

तेवढ्यात सायलीच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात वाजू लागला. चित्रविचित्र आवाज येऊ लागले. अंगणात कोणीतरी जोरात ओरडत आहे अस वाटू लागलं. देशमुख साहेब प्रियाचा पदर खेचत तिला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करू लागला. वासनेच्या समोर त्याला दुसरे काहीच सुचत नव्हते. प्रियाने त्याला जोरदार धक्का दिला. तो मागे जाऊन पडला. प्रिया पुढे पळत होती. हॉलमध्ये येताच खाली पडली. समोर देशमुख साहेब उभा होता. तिच्याकडे बघत बोलू लागला.
“तुला एवढ कळतं नाही का ?? मी तुला मुंबई वरून पुण्याला इकडे तेवढ्यासाठीच आणलय ते !! “
“म्हणजे ?? काय बोलताय तुम्ही !! ” आपला पदर सावरत ती म्हणाली.
“तुला मुंबईला ऑफिसच्या फॅमिली फंक्शन मध्ये पाहिलं तेव्हाच तुझ्यावरून माझी नजर हटत नव्हती !! तुझ्या सोबत एक रात्र तरी घालवावी अस मला सारखं राहून राहून वाटत होत !! म्हणून तुझ्या नवऱ्याची बदली इकडे केली !! त्याची लायकी नसताना त्याला ऑफिसर वरून जनरल मॅनेजर केला. कोणासाठी माहितेय ?? तुझ्यासाठी ??” देशमुख साहेब प्रिया जवळ येत म्हणाला.
“हे बघा मी फक्त माझ्या श्रीधरची आहे !! “
“काय लावलय सारखं !! श्रीधर श्रीधर !! माझ्या मिठीत ये विसरून जा त्या श्रीधरला !!”
“कमीत कमी तुमच्या वयाच तरी भान ठेवा !! मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे !!”
“पण मुलगी नाहीस ना ??” देशमुख साहेब तिला मिठीत घ्यायला पुढे सरकले. तेवढ्यात प्रिया उठून बाजूला गेली.
शेजारी पडलेली बाटली फोडून तीने ती त्यांच्या समोर धरली.
“हे सगळं सोडून दे ! प्रिया माझ्या मिठीत ये !! “
“तुमच्या बायकोचा तरी विचार करा !! त्या किती प्रेम करतात तुमच्यावर !!”
“ये !!उगाच तीच नाव नको काढू !! म्हातारी साली !! तिच्यासोबत लग्नच मी या धनदौलत संपत्तीसाठी केलय!! पण तुझ्यात जी जादू आहे ती तिच्यात नाही !!”

प्रिया मागे मागे सरकू लागली. सायलीच्या खोलीतून आवाज जोरात येऊ लागले. अंगणात मोठ्याने आवाज लागले. तेवढ्यात मेन डोअर मधुन नंदा आत आली.
“ताईसाहेब !! “
नंदाला पाहून प्रिया तिच्या मागे पळत गेली.
“काय झालं ताईसाहेब ?? “
“हा माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतोय !”
“का रे म्हाताऱ्या !! सांगू का मालकीण बाईना !!”
“नंदे !! तू बाजूला हो !! तुझ तुझं काम कर !! आमच्या मध्ये नको पडूस !!”
“चल निघ रे !! हलकट भाड्या !! लाज कशी वाटत नाही आपल्या मुलीच्या वयाच्या पोरीवर वाकडी नजर ठेवायला !!”
“तू गेलीस नंदे आता !! तुझ आणि तुझ्या नवऱ्याच काही खर नाही !! आता !! आता हाकलून देतो तुम्हाला नौकरी वरून !!”
“अरे तू काय हाकलून देणार !! मीच मारते लाथ तुझ्या असल्या कामाला !! निघ इथून !! नाहीतर मालकीण बाईना सांगून तुझी धिंडच काढते बघ !!”

देशमुख साहेब रागारागात बंगल्यातून बाहेर पडला. त्याच्या डोळ्यात वेगळीच आग दिसत होती. प्रिया मात्र पूर्ण कोसळून गेली होती. नंदाला मीठी मारून ती भीतीने रडत राहिली.
“ताईसाहेब !! रडू नका !! हा भाड्या पहिल्यापासून असाच आहे !! याची नजरच मेल्याची वाईट आहे !! “
“पण मला काय करावं काहीच सुचत नव्हतं नंदा !! आज तू नसतीस तर माझं काय झालं असतं !! देवासारख धावून आलीस आज !!”
“चांगल्या लोकांसोबत नेहमीच देव असतो !! नका काळजी करू आता !! कसा येतो पुन्हा ते बघते मी !! “

दोघी बोलतं असताना सायलीचा आवाज येतो. ती आईला मोठ मोठ्याने आवाज देत होती.
“आई !! दरवाजा का बंद केलाय!! आई !! “

दोघी सायली जवळ जातात. सायलीला मिठीत घेऊन प्रिया खूप वेळ बसते.

“पण नंदा !! तू गेली होतीस तर पुन्हा का आलीस ??”
“त्याच काय झालं !! मी घाईघाईत निघाले तेव्हा माझा मोबाईल मी इथेच विसरून गेले हे लक्षात आलं !! अर्ध्या वाटेतून परत आले मोबाइल घ्यायला. आले तर बंगल्यातून मोठ मोठ्याने आवाज ऐकले. आणि बाहेर त्या भाड्याची गाडी पाहिली तेव्हाच मला कळलं काय प्रकार आहे.आले मग धावत”
“पण मानलं पाहिजे बर तुला !! तेव्हा पळून गेलीस !! आणि आज माझ्या मदतीला धावत आलीस !! खरी नंदा आहे तरी कोण मग ??”
“दोन्ही मीच आहे !! ” नंदा प्रियाकडे पाहून हसली.

त्या दिवशी नंदा संध्याकाळ झाली तरी प्रिया सोबत थांबली. उशिरा श्रीधर घरी आला. प्रिया त्याला पाहताच त्याच्या मिठीत गेली. मनमोकळे पणाने रडली. झाला प्रकार श्रीधरला सांगीतला. श्रीधरच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
“त्या हरामखोराला सोडत नाही आता !! ” श्रीधर आवेशात बंगल्यातून बाहेर जाऊ लागला. पण पुन्हा त्याला त्या झोपाळ्यावर ती बाई रडताना दिसली. तिला पाहून तो रागातच म्हणाला.
“त्या भाड्याने देशमुखाने तुला पण भोगायचा प्रयत्न केला का ??” असे म्हणताच माया मोठ्याने ओरडली. श्रीधर तिच्या आवाजाने घाबरला.
“काय झालंय तुला !! मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तू रडत असते ! काय झालंय तुला ??”
“काय झालंय मला !! अरे कोणाला सांगू काय झालंय मला !! हो जेव्हा जेव्हा तू भेटलास तेव्हा तेव्हा मी रडले कारण प्रत्येक घाव शरीरावरचा मला त्याची आठवण देतोय !! माझं मुल हिरावून घेतलं त्याने !! माझ्या डोळ्या देखत जाळलं त्या भाड्याने !! हो मी रडतेय !! माझ्या मुलासाठी !! माझ्या मुक्तीसाठी ! ! मला बदला हवाय त्याचा !! “
“काय झालंय पण !! काही सांगशील तर कळेल ना !! “
“कोणाला सांगू तुला !!तूही एक पुरुषच ! फक्त स्त्रीच्या शरीराचा उपभोग घेणारा!”
“मी तसा नाहीये !! मी फक्त माझ्या प्रियावर प्रेम करतो. “
असे म्हणताच माया जोरजोरात हसू लागली.
“ये मी तसा नाहीये ??” श्रीधर मोठ्याने ओरडला. रागात पाहू लागला.

त्याच्या आवाजाने प्रिया आणि नंदा धावत बाहेर आल्या. प्रिया त्याला विचारू लागली.
“काय झालं श्रीधर ?? ओरडतोयस का??”
“ही ही माया !! मला म्हणते सगळे साले पुरुष स्त्रीचा उपभोग घेणारेच असतात. “
“माया !! माया !! ” नंदा तोंडातल्या तोंडात पुटपुट करू लागली.
“हो हो !! ही माया ! साला करणार तो देशमुख आणि दोष आमच्या सारख्या पुरुषांवर !!”
“साहेब माया आलिये !! माया आलीये !” नंदा मागे झोपाळ्यापासून लांब जात म्हणून लागली.
“हो आलीय !”
“पण कसं शक्य आहे ते ??”
“ही काय माझ्या समोर आहे ती !!” श्रीधर झोपाळ्याकडे पाहत म्हणाला.
“पण साहेब माया सतरा वर्षांपूर्वीच मेली आहे !!”
“काय ??” श्रीधर आश्चर्यचकित होऊन बघू लागला.
“ये श्रीधर तू शांत हो !! आपण निघून जाऊ इथून मुंबईला !! नको आपल्याला हे काही !!काही गरज नाही त्या देशमुखकडे जायची !! नको आपल्याला बदला !! आपण इथून दूर जाऊ!! ” प्रियाला श्रीधरचे ते वागणे पाहून त्याची काळजी वाटू लागली.

श्रीधर एकटक झोपाळ्यावर बसून हसणाऱ्या मायाकडे पाहत होता. ती सतत एकच गोष्ट म्हणत होती.
“तूही एक पुरुषच आहेस! वासनेत बुडालेला !! एक पुरुष !! हा हा हा हा !! “

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *