बंगला नंबर २२ || कथा भाग ४ || चेहरा || मराठी भुताची गोष्ट ||

कथा भाग ४ || चेहरा ||

नेहमीप्रमाणे सकाळी नंदा लवकर येऊन स्वयंपाक करू लागली. रात्रभर जागरण झाल्याने प्रिया अजूनही झोपली होती. तिच्या जवळच तिला बिलगून सायली होती. श्रीधर मात्र लवकर उठून हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. त्याला बघून श्याम अंगणातल काम सोडून आत हॉलमध्ये आला. थोडा वेळ श्रीधर जवळ शांत बसला आणि पुन्हा बोलला.
“साहेब !! राग येणार नसेल तर एक बोलू का ??”
“हा बोल ना !!”
“साहेब !! तुम्ही नका राहू इथ !! हा बंगला शापित आहे साहेब !!”
“पुन्हा सुरू झालं तुझं !! मी हजार वेळा सांगितलंय असल्या अंधश्रध्देवर माझा विश्वास नाहीये म्हणून !!”
“आहो साहेब पण तुमच्या मुलीची अवस्था तर बघा !!”
“तुला म्हणायचं की इथल्या भुताने तिची ही अवस्था केली तर !!” श्रीधर हसत म्हणाला.
“होय साहेब !! “
“व्हा छान !! अरे व्हायरल आहे ते !! सकाळीच मी माझ्या मुंबईच्या डॉक्टर मित्राशी बोललो !! तो म्हणाला कधी कधी ताप जास्त झाला की अशी बडबड होते म्हणून !!”
“आहों पण ते !!”
“बास !! जा कामाला जा !! ” श्रीधर त्याच्याकडे हसत पाहू लागला.
“तरीपण एकदा विचार करा साहेब !!”

श्याम पुन्हा कामाला लागला. नंदाने तेवढ्यात श्रीधरला चहा आणून दिला. चहा घेत घेत त्याने विचारलं.
“ताईसाहेब उठल्या नाहीत वाटत अजून !!”
“नाही ना !! अजून दोघीही झोपून आहेत !! “

नंदा थोडी घाबरत घाबरत बोलतं होती. किचन मध्ये परतत असताना समोर प्रिया येते. तिला पाहून ती जोरात किंचाळते.
“मी आहे !! मी प्रिया !!” नंदाकडे पाहत प्रिया म्हणते. तिच्या तोंडावर हात ठेवत पुन्हा बोलते,
“हळू ना !! सायली आता कुठे सकाळी झोपली आहे, उठेल तुझ्या आवाजाने !!”
“सॉरी ताईसाहेब !!”
“आणि काय ग !! काल सायलीला त्रास होत होता तर पळून गेलीस चक्क तू !!”
“ते ना !! मला काही सुचलच नाही बघा !!”
“जा काम कर!! सुचलं नाही म्हणे !!”

प्रिया हॉलमध्ये येत श्रीधर जवळ बसली. तिला पाहून लगेच श्रीधरने सायली बद्दल विचारलं.
“आता बरी आहे ना सायली ??”
“हो !! ताप नाहीये आता !! शांत झोपली आहे !! “
“ओके !! गुड !! पण तरीही आज ऑफीसला नाही जात मी !! “
“अरे पण साहेब ??”
“देशमुख साहेबांना मी सांगेन काय ते !! ते घेतील सांभाळुन !!”
“ठीक आहे !! मी फ्रेश होऊन घेते !!” प्रिया बाथरूम मध्ये जाते.

श्रीधर जगतापना फोन करून आज ऑफिसमध्ये येणार नसल्याचे सांगतो. आजचा दिवस फक्त तो आणि त्याची फॅमिली एवढ्याचसाठी ठरवतो. दुपारनंतर नंदा आणि श्यामलाही जायला सांगतो. त्या शांत बंगल्याच्या अंगणात निवांत झोपाळ्यावर बसून तो पुस्तक वाचत बसतो. त्यावेळी नकळत त्याच्या मनात असंख्य विचारांचा कल्लोळ माजतो. हळूच ते पुस्तक बाजूला ठेवून तो त्यात हरवून जातो,

“आज या निवांत क्षणात मला माझ्या आयुष्याचे किती जुने क्षण आठवतायत !! मी प्रिया आणि आमची ती पहिली भेट !! किती सुंदर होतीना !! अस वाटत आजही मी पुन्हा त्या क्षणात जाऊन तिच्या सोबत मनसोक्त फिरावं. अगदी पुन्हा नव्याने तिच्यावर प्रेम करावं. नाहीतरी तिच्याशिवाय अजून कोण आहे माझ्या आयुष्यात. कॉलेज मध्ये ती मला भेटली, आम्ही प्रेमात पडलो, आणि घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आम्ही पळून जाऊन लग्न केलं. पुन्हा सगळं ठीक झालं म्हणा. पण शेवटी घरचे दुरावले ते कायमचेच. आता प्रिया सारखी इतकी समजूतदार बायको मला शोधून तरी मिळाली असती का ?? नाही ना !! पण नाही !! आईने आणि बाबांनी बोलणं टाकलं ते कायमच !! नंतर आली सायली !! जणू माझं जग तिने पूर्ण केलं. माझी मुलगी !! सायली म्हणजे प्रियाची सावलीच आहे. कधी कधी तर वाटत !! आमच्या दोघांपेक्षा ती जास्त समजूतदार आहे !! कधीही आम्ही दोघे रुसून बसलो तर मध्ये येऊन आमच्या दोघांनाही मीठी मारेल आणि सगळा राग , कडवटपणा पळवून लावेल !! संध्याकाळी खरतर तिची ती अवस्था पाहून मीही घाबरून गेलो होतो. माझ्या मुलीला काही जरी झालं तरी मला वाटतं मलाच ते होतंय !! बहुतेक याच जाणीवेला बाप असे म्हणत असणार !!” श्रीधर जणू आपल्या विचारात गुंग होऊन गेला होता.

“साहेब !! माझा मुलगा सापडला का हो ??”
श्रीधर अचानक भानावर आला. पाहतो तर ती स्त्री त्या रात्रितली पुन्हा त्या झोपाळ्यावर त्याच्या बाजूला बसली होती. तिला पाहताच क्षणात श्रीधर जागेवरून उठला. तिच्या पासून जरा लांब गेला. त्याला काय बोलावं तेच कळेना.
“बाई ! तू !! तू !! तुम्ही पुन्हा इथेच !! काय हवंय आता तुम्हाला??”
“माझा मुलगा !! प्रतीक ??”
“तो त्या रात्रीनंतर मला कुठे दिसलाच नाही !”
“कसा दिसेल साहेब तो आता !! माझा मुलगा तर मेला!! “
“काय ??”
“होय साहेब !! मारला त्याला !! मारला त्याला !! ” माया नजर रोखून श्रीधरकडे पाहते.
मायाच्या डोळ्यातून रक्त येऊ लागतं. तिला पाहून श्रीधर म्हणतो.
“बाई !! तुमच्या डोळ्यातून रक्त येतंय !! तुम्हाला खूप लागलंय !! त्या दिवशी सुद्धा तुम्ही अश्याच निघून गेलात !! थांबा आता कुठे जायचं नाही !! मी फर्स्ट एड किट आणतो !!”

श्रीधर धावत बंगल्यात जातो. त्याला प्रिया वर धावत जाताना पाहते. ती त्याला मागून हाक मारते.
“श्रीधर ! अरे काय झालय !धावतोयस का एवढा ??”

श्रीधर परत धावत खाली येतो. हातात त्याच्या फर्स्ट एड किट बॉक्स बघून प्रिया त्याला विचारते.
“काय झालंय श्रीधर ?? तुला काही लागलंय का ??”
“नाही !! ती माया !! पुन्हा आली आहे !! तिच्या आंगातून रक्त येतंय !! डोळ्यातून रक्त येतंय !! तिच्यासाठी !!”
“कोण माया ?? कुठे आहे ??”
“इथे अंगणात आहे आपल्या !! झोपाळ्यावर बसलिये!! ” श्रीधर प्रियाला अंगणात घेऊन येत म्हणतो.
पण अंगणात कोणीच नसतं. झोपाळा रिकामाच हलत होता.
“इथे तर कोणीच नाहीये !! ” प्रिया सगळीकडे पाहत म्हणते.
“आत्ता होती इथे ! जाऊदे गेली असेल ! इथेच शेजारी राहते !!तिचा मुलगा प्रतीक खूप खोडकर होता !! मी आलो तेव्हा तर खूप मस्ती करत होता !! नुसता घरभर दंगा करायचा !!”
“पण इथे आपल्या बंगल्यात ??”
“हो !इथेच !”
“तिचा मुलगा मेला म्हणाली ती !! खूप वाईट वाटलं ऐकून !! “
“ओह ! खूप वाईट झालं !! बरं जाऊदे आता !! चल जेवून घेऊयात !!”

श्रीधर आणि प्रिया दोघेही हॉलमध्ये बसून गप्पा मारत जेवत असतात.
“सायली उठली नाही अजून ??” श्रीधर प्रियाला विचारतं होता.
” आई !! ” तेवढ्यात मागून सायली प्रियाला हाक मारते.
सायली झोपेतुन उठून खाली आली होती. तिला पहातच प्रिया जागेवरून उठली. तिला कडेवर घेत बोलू लागली,
“झोप झाली बाळा ??”
“हो आई !! “
“आता मस्त वरण भात खायचा ! आणि मग आई देईल त्या गोळ्या खाऊन मग मस्ती करायची !!” श्रीधर सायलीला पोटात गुदगुल्या करत म्हणाला.
सायली मोठ्याने हसली.
” पण आता मी एकदम बरी आहे! ते कडू कडू औषध नको मला आता प्लीज !!”
“हो मग मी कुठे म्हणतोय तू आजारी आहेस !! तुला परत ताप येऊ नये त्यासाठी म्हणतोय !!”
“आता मला ताप येणारच नाही ना !!” सायली श्रीधरकडे जात म्हणाली.
“आय नो बाळा !! यू आर सो स्ट्राँग!! ” श्रीधर हसत तिच्याकडे पाहत म्हणाला.

दिवसभर तिघेही मस्त गप्पा मारत बसले. संध्याकाळी सायली लवकर जेवण करून,औषध घेऊन झोपी गेली. प्रिया आणि श्रीधर ती झोपी गेल्यावर हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत बसले. अचानक त्यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज झाला. दोघेही पळत सायलीच्या खोलीत गेले, पाहतात तर सायली आपल्या बेडवरून खाली पडली होती.

“सायली ! ये सायली !!” श्रीधर पळतच तिला उचलण्यासाठी गेला.
“खाली कशी पडलीस पण तू ??” प्रिया तिला काळजीने विचारू लागली.
श्रीधरने तिला हात लावताच त्याला जाणवलं,
“प्रिया पुन्हा ताप वाढलाय !! “
“अरे पण दुपारी तर चांगली होती ती ! अचानक ताप ??”
“थांब मी विकासला फोन करून विचारतो !! नेमक हे कशामुळे होतंय ते !! त्याचा सल्ला घेऊयात आणि मग ठरवूयात काय करायचं ते !!”
“हो चालेल !! विचार तू पटकन !”

प्रिया सायली जवळ बसून राहते. श्रीधर विकासला फोन लावत बाहेर जातो. दोन तीन वेळा फोनची रिंग वाजल्या नंतर विकास फोन उचलतो.
“हा बोल श्रीधर !! “
“अरे तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं मी ??” श्रीधर अगदी दबक्या आवाजात बोलतो.
“अरे नाही रे ! क्लिनिक बंद करायची वेळ झालीना!! म्हणून आवरत होतो सगळं !! पण ते जाऊदे ना !! बोल सायली कशी आहे आता ??”
“त्याविषयी बोलायला फोन केला होता मी !! “
“कारे काय झालं आता ??”
“दिवसभर बरी होती सायली !! दुपारी तर मस्त खेळली ,माझ्या सोबत गप्पा मारल्या ,तापही नव्हता!! पण संध्याकाळी पुन्हा ताप वाढला रे !! आता झोपून आहे !!”
“ओके !! बरं तू आता एक काम कर !! मी तुला काही औषधं मेसेज करतो !! ते तिथे मिळाले तर बघ !! पुढे ते कसे घ्यायचे ते सांगेन !! “
“हो चालेल !! आणि सॉरी रे तुला सारखा त्रास देतोय ते !!”
“बोललास हे !! मित्र मित्र म्हणतोस !! आणि सॉरी ?? “
“अरे तस नाही रे !!पण !!”
“पण नाही आणि काही नाही !! अरे मित्र आहोत आपण !त्रास कसला रे ! आणि काळजी करू नकोस !! काही होणार नाही सायलीला !! जास्तच तुला काळजी वाटली तर अर्ध्या रात्री फोन कर !! पुण्यात माझे चांगले डॉक्टर मित्र आहेत !! हवतर त्यांच्याकडे घेऊन जा !! “
“थॅन्क्स रे !! आल्यापासून इथे काही सुधरतच नाही रे !! आल्यापासून सायली आजारी आहे !!”
“होईल रे सगळ ठीक नको काळजी करू !!”

श्रीधर विकास सोबत बोलणं झाल्यावर प्रियाला हाक मारतो.
“प्रिया !! विकासने काही औषध आणायला सांगीतली आहेत !! मी आलो लगेच जाऊन !!”
“श्रीधर !! लवकर ये ! इथे एकटीला मला खूप भीती वाटते रे !! “
“काळजी करू नकोस !! लगेच आलो !! “

श्रीधर धावतच बाहेर पडतो. पुढे श्यामला जाऊन भेटतो.त्याच्या सोबत औषध आणायला जातो. प्रिया सायली सोबत खोलीत होती. सायली प्रियाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली होती. कित्येक वेळ ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत अंगाई गात होती. तेवढ्यात मेन डोअर बेल वाजते. प्रिया हळूच सायलीच डोकं उशीवर ठेवत दबकत दबकत हॉलमध्ये येते. दरवाजा उघडताच ती गोंधळून जाते. थोडी मागे सरकते,
“श्रीधर ?? “
“ते आताच बाहेर औषध आणायला गेलेत ! आपण इथे ??” प्रिया थोडी तुटकच बोलते.
“हो !! आज श्रीधर ऑफिसमध्ये आला नाही म्हणून म्हटलं जाऊनच तुमची चौकशी करूयात !!” देशमुख साहेब आत येत म्हणाले.
खरतर प्रियाला त्यांनी आलेलं अजिबात आवडलेल नव्हतं. पण तरीही ती त्यांना हसून बोलत होती.
“किती वेळ लागेल श्रीधरला ??” देशमुख साहेब समोरच्या सोफ्यावर बसत म्हणाले.
“माहीत नाही !! ” प्रिया देशमुख साहेबांपासून नजर चोरत म्हणाली.
“ठीक आहे !! बाकी सगळं मस्त आहे ना ??” देशमुख साहेब एकटक प्रियाकडे पाहत होते.
“म्हणजे ??”
“म्हणजे !! पुणे !! आपलं ऑफिस !! हा बंगला ??”
“हो छान आहे !! ते येतील एवढ्यात ! तोपर्यंत मी तुम्हाला चहा करते !!”
“एवढ्या रात्री चहा ?? पण ठीक आहे तू करणार म्हटल्यावर चालेल मला !!”

प्रिया काहीच न बोलता आत किचनमध्ये जाते. तिला खरतर खूप भीती वाटत होती. पण ती हतबल होती. देशमुख साहेबांचं तिच्याकडे असं पाहणं, डोळ्यातून अखंड वाहणारी वासना, तिच्या नजरेतून सुटली नव्हती. ती किचन मध्ये चहा करत कित्येक विचार करत होती. सतत श्रीधरला फोन लावत होती. पण श्रीधर काही केल्या फोन उचलत नव्हता. अचानक तिच्या मागून आवाज येतो,
“काही मदत करू का ??”
“नाही !! काही गरज नाही !! मी करते चहा !! तुम्ही बसा ना बाहेर !! ” प्रियाला आता काय बोलावं काहीच कळेना.

देशमुख साहेब हळू हळू तिच्या जवळ येऊ लागले. तिच्या कंबरेवर नजर खिळवून चालू लागले. प्रिया मात्र चहा करत होती. त्यापासून अनभिज्ञ होती. चहाचा कप घेऊन ती वळताच , समोरच देशमुख साहेब तिला दिसले. अगदी जवळ. त्यांना पाहून ती लांब झाली.
“तुम्ही चला हॉलमध्ये !! मी केलाय चहा !! हा घ्या !! “

एकटक तिच्याकडे पाहत देशमुख साहेब जवळ पुन्हा येण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात सायलीच्या खोलीतून मोठ्यात तीने किंचाळल्याचा आवाज आला. चहाचा कप प्रियाच्या हातून खाली पडला. ती धावतच सायलीच्या खोलीत गेली. पाहते तर सायली पुन्हा त्या कोपऱ्यात उभी राहिली. तिच्यामागे देशमुख साहेब पण खोलीत आले. थोडा वेळ थांबताच शेजारचे कपाट त्यांच्या अंगावर पडू लागले. त्यांना कोणीतरी मागे खेचलं. पाहतो तर श्रीधर आला होता. कपाट खाली पडताच त्याचे आरशे फुटले. त्याच्या काचा खोलीत सर्वत्र पसरल्या.

“साहेब !! तुम्ही इथ ??”
“हो ! अरे तू आला नाहीस ना ऑफिसमध्ये म्हणुन तुझी विचारपूस करायला आलो ! “
“सायली ?? ये सायली !!”
“आई !! ” सायली रडतं रडतं प्रियाला मीठी मारते.

श्रीधर आणि देशमुख साहेब बोलतं बोलतं हॉलमध्ये येतात.
“जगतापने सांगितलं !! तुझी मुलगी आजारी आहे म्हणून !! मग ऑफिस मधून घरी जाता जाता भेटून जाव म्हटलं !! “
“खरंच खूप बरं वाटलं साहेब आपण आलात ते !! “
“बरं !! आता काळजी घे मुलीची ! मी येतो !!”
“ओके साहेब !”

देशमुख साहेब निघुन जातात. जाता जाता सुद्धा त्यांची नजर खिडकीतून प्रियावरच असते. प्रिया मात्र सायलीला औषध देण्यात व्यस्त होती. श्रीधर पटकन सायलीच्या खोलीत येतो. त्याला पाहताच प्रिया त्याला जोरात मीठी मारते. आणि रडू लागते.
“ये वेडाबाई !! काय झालं रडायला ??”
“किती वेळ यायला ? आणि फोन का उचलत नव्हतास ??”
“अरे बाबा त्या श्यामच्या बाईकवर गेलो होतो !! आणि चालवत मीच होतो !! त्यामुळे उचलताच आला नाही!! “
“पण मला तुझी किती काळजी वाटत होती माहीत आहे ??”
“हो बाबा !! सॉरी !!”

दोघेही कित्येक वेळ एकमेकांच्या मिठीत राहिले. सायली आता गाड झोपली होती. पण प्रियाच्या मनात वेगळंच द्वंद्व चालू झालं होत. घडला प्रकार श्रीधरला सांगावा तरी कसा ?? श्रीधर त्यावर काय रिॲक्ट करेन. याचा ती विचार करत होती. पण न रहावुन ती बोलली,
“श्रीधर ! आपण नको राहुयात इथे !! आपल्या मुंबईला परत जाऊ !!”
“अस अचानक नाही जाता येणार आपल्याला ! !हवं तर तू आणि सायली जावून या !!”
“नाही नको !! अश्या अवस्थेत सायलीला कुठे प्रवास करायला लावायचा. तिला बर वाटायला लागलं की जाते “
“ठीक आहे !! “

दोघे रात्रभर एकमेकांच्या मिठीत अगदी हरवून गेले. प्रणयाच्या त्या सागरात बुडून गेले. रात्र ती आज शांत होती.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *