भाग २ || सरप्राइज ||
धावत धावत तो मागच्या दरवाजात येतो. ते मूल पुन्हा पळून जात.
“काय वैताग दिलाय या पोराने ! कोणाचं आहे काही माहीत नाही !!” श्रीधर दरवाजा बंद करत म्हणतो.
खिडकीतून बाहेर पाहतो तर त्याला कोणच दिसत नाही. हॉलमध्ये येतो नी टीव्ही चालू करून पाहत बसतो. कित्येक वेळ टीव्ही पाहून झाल्यावर. एकटाच बसून तो जेवण करतो. त्यावेळी तो प्रियाला फोन लावतो.
“काही नाही ग!! पुण्यापासून थोड बाहेर आहे एवढंच !! तुला मी पत्ता पाठवला होता ना !! “
“हो रे !! पाठवला आहेस तू !!”
“बरं ऐक ना !! याना तुम्ही लवकर इथे !! मला ना आता खूप बोर व्हायला लागलंय !!”
“होका !! एका दिवसात बोर झालास !! “
“तुझ्याशिवाय एक दिवसही करमत नाही माहितेय ना तुला !! “
“होका !! मग कशाला गेलास एवढ्या लवकर !! म्हणाले होते ना मी आपण मिळूनच जाऊया ते !!”
“तुमचीच गैरसोय होऊ नये म्हणून आलो ना आधी !! सगळा बंगला आवरला !! मस्त टापटीप करून ठेवला !! म्हटलं आल्यावर मॅडम साहेबांना काही त्रास नको !!” श्रीधर हसत म्हणाला.
“बरं बरं !! कळल हा मला !!” प्रिया हसत म्हणाली.
दोघेही कित्येक वेळ बोलत बसले. तेवढ्यात अंगणातून कोणीतरी रडतंय असं श्रीधरला ऐकू आलं.
“प्रिया !! एक मिनिट हा !! मी तुला नंतर कॉल करतो !! “
“अरे !! काय झालं !! श्रीधर !! श्रीधर !! ” प्रिया बोलतं राहिली.
श्रीधर फोन बाजूला ठेवून अंगणात गेला. पाहतो तर झोपाळ्यावर कोणी एक स्त्री रडत होती. तिला पाहून त्याला काय करावं काहीच कळलं नाही. तो क्षणभर तिथेच थांबून राहिला आणि धीर करून त्या स्त्री जवळ गेला.
“बाई कोण ?? कोण आपण ?? आणि इथे आमच्या बंगल्यात काय करताय ??”
ती काहीच बोलतं नाही. फक्त अंग चोरून त्या झोपाळ्यावर बसून राहते. श्रीधर क्षणभर शांत राहतो आणि पुन्हा बोलतो.
“कोण आहात आपण ?? आणि एवढ्या रात्री इथे कश्या काय ?? “
श्रीधर बोलताच ती स्त्री नजर वर करून श्रीधरकडे पाहते. तिने पहाताच श्रीधर मागे सरकतो. त्याला एक वेगळीच आग त्या नजरेत जाणवते. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जागोजागी रक्त येत असल्याचं त्यानं पाहिलं. आणि तो तिला म्हणाला.
“काय झालंय बाई तुम्हाला..!! तुम्हाला खूप लागलंय !! तुम्हाला कोणी त्रास देतंय का ?? मी पोलिसांना फोन करू का ?? ” श्रीधर कित्येक प्रश्न तिला विचारू लागला. त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्या अनोळखी शहरात तो एकटाच होता. आणि अचानक त्या अनोळखी बाईमुळे तो अजून गोंधळून गेला होता.
“पोलिसांना नको !! नको ! ! ” ती स्त्री पुन्हा पुन्हा बोलू लागली.
“बरं ठीक आहे !! नाही बोलवत ! तुम्ही शांत व्हा !! “
दोघेही थोडा वेळ शांत बसतात.
“आपण ??” न रहावुन श्रीधर पुन्हा बोलतो.
“मी माया !! इथेच राहते जवळ !! “
“ओके ! !! पण मग रडतं का होतात आपण ??”
“माझा मुलगा प्रतीक !! सापडत नाहीये !! कुठे गेला काहीच कळत नाहीये !! त्याला शोधून शोधून थकले !!”
“म्हणजे तो रात्री बंगल्यात अंगणात फिरतो तो तुमचा मुलगा ?”
“हो माझाच आहे !! किती वेळा त्याला सांगितलं पण ऐकायचं नाव नाही !! रात्र पहायची नाही , दिवस माहीत नाही !! नुसतं खेळत असतो !!” माया बोलतं बोलतं सगळीकडे पाहत होती.
“हो पण रात्री अपरात्री तुम्ही त्याला बाहेर येऊच कसे देता ?”
“त्याला मी अडवणारी कोण !! तो तर मुक्त आहे ना !! माझ्या मायेपोटी इथेतरी जवळ फिरतोय !! नाहीतर केव्हाच निघून गेला असता !”
“खरंय !! आईचं प्रेम लेकरू कुठंही असो पुन्हा तिच्याजवळ खेचून आणत त्याला!! ” श्रीधर तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला.
“चला मी निघते !! पाहते कुठे गेलाय तो! तुम्हाला कुठे दिसला तर त्याला एवढंच म्हणा आई तुझी वाट बघतेय !! ” माया झोपाळ्यावरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या हाताला लागलेल पाहून श्रीधर न राहून तिला म्हणतो.
“तुम्हाला खूप लागलंय !! थांबा बर !! मी फर्स्ट एड किट आणतो !! त्या जखमेवर मलम लावल्यावर बर वाटेल तुम्हाला !!” श्रीधर असे म्हणत आत जातो. धावतच पुन्हा बाहेर येतो. पाहतो तर झोपाळ्यावर कोणीच नव्हतं.
“गेल्या वाटत !! आईची मायाच तेवढी या जगात ताकदवान आहे, जी मुलाला सुधारू शकते!! आणि त्या मायेपुढे आईलाही दुखलं खुपल तरी काहीही वाटत नाही. ” श्रीधर स्वतःलाच बडबडत हॉलमध्ये येतो.
कित्येक वेळ श्रीधर मायाचा विचार करत बसतो. काही केल्या त्याच्या डोक्यातून तिचा चेहरा जात नव्हता. त्या चेहऱ्यावर त्याला एक वेगळाच राग दिसत होता पण काही क्षणांत एक काळजीही वाटत होती. कदाचित त्या मुलाची असेल असे त्याला वाटू लागले.
वैतागुन तो रात्री कित्येक वेळ टीव्ही पाहत बसला. टीव्ही पाहत असतानाच त्याला आपल्याकडे वाकून पलिकडच्या खोलीतून कोणीतरी पाहतंय अस वाटू लागलं. तो हळू हळू त्या खोलीकडे जाऊ लागला. त्याला वाटले एवढ्या रात्री चोरपावलांनी बंगल्यात चोर आले असावे. म्हणून तो त्या बाजूने जाऊ लागला.
“कोण आहे तिथे ??”
श्रीधर बोलताच त्या खोलीतून पळण्याचा आवाज आला. श्रीधर धावतच तिकडे गेला. तर तिथे त्याला कोणीच दिसलं नाही. तो पुन्हा खोलीतून बाहेर हॉलमध्ये जाताना, अचानक ते मूल त्याच्या समोर आले.
“हा !! ” मोठ्या आवाजात ते ओरडले.
श्रीधर भिऊन मागे गेला. क्षणभर त्याला काहीच कळलं नाही. पण नंतर तो सावरला. समोर पाहतो तर ते मुल त्याच्याकडे पाहून हसत होत. श्रीधर सावरून त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला.
“काय भीती घालतोस रे !! तू प्रतीक ना ??”
ते मूल त्याच्याकडे पाहून फक्त हसत होत. श्रीधर त्याच्या हसण्याकडे पाहत म्हणाला.
“किती आगाव आहेस रे !! कालपासून नुसता गोंधळ घातला आहेस !! मघाशी तुझी आई आली होती तुला शोधत !! “
आई म्हणताच त्या मुलाचे हसू गेले आणि चेहरा रडकुंडीला आल्या सारखा झाला. श्रीधरला हे लक्षात आलं. आणि तो म्हणाला.
“रडू नकोस !! जा आई तुझी वाट पाहतेय !!”
श्रीधर असे बोलताच ते मुल वाऱ्याच्या वेगाने पळून गेले. श्रीधर त्याच्याकडे फक्त पाहत राहिला.
त्यानंतर ते मूल त्याला कुठेच दिसल नाही. तो रात्री उशिरा झोपी गेला.सकाळी उठला ते थेट श्याम कामावर आल्यावरच.
“काय साहेब !! एवढा वेळ झोपता!! “श्याम किचन मध्ये जात म्हणाला.
श्रीधर समोर लावलेल्या घड्याळात पाहत पटापट आवरायला लागतो.
“चला चला !! खरंच आज उशीर झाला !! आज ऑफिसचा माझा पहिला दिवस आजच उशीर नको व्हायला !! श्याम पटकन उरक रे !! मी आलोच अंघोळ करून !!” श्रीधर एवढं बोलून पटकन् अंघोळीला पळाला.
“नका टेन्शन घेऊ साहेब !! दहा मिनिटात जेवणच देतो तुम्हाला !!” श्याम बोलून किचनमध्ये जात असतानाच मेन डोअर बेल वाजते. ती ऐकताच श्याम तिकडे जातो.
“घाईच्या टायमिंगला कोण आलंय कोणाला माहिती !! ” श्याम दरवाजा उघडतो.
समोर दत्तू जगताप याना पाहून म्हणतो.
“अरे !! जगताप साहेब !! या या !! “
“साहेब उठले का नाही रे ??”
“आताच उठलेत !! अंघोळीला गेलेत !! येतीलच एवढ्यात आवरून !!”
“बरं बर ! त्यांना काही कमी जास्त सगळं नीट पाहतोय ना ??”
“काळजी नका करू साहेब !! एकदम मस्त जेवण करून देतोय त्यांना !! काल सगळा बंगला आवरून दिला !! “
“व्हा छान !! असच काम करत रहा !! “
जगताप हॉलमध्ये सोफ्यावर बसत म्हणाले. श्याम न रहावुन त्यांना म्हणाला.
“साहेब ! जोशी साहेबांना दुसरा बंगला नव्हता का हो ?? इथेच यायचं होत !!”
जगताप असे ऐकताच उठून त्याच्या जवळ येत म्हणाले,
“ये श्याम्या उगाच त्या साहेबांच्या डोक्यात भलतंच काही घालू नकोस बर का !! गपचुप काम करायचं नाहीतर मालकांना सांगून तुझी सुट्टी करून टाकेन !!”
“नाही साहेब !! मी कशाला काय म्हणतोय !! फक्त रात्रीच मी लवकर निघणार एवढं मात्र ध्यानात ठेवा !!”
“काम केल्यावर कधीही निघ !! “
श्याम आणि जगताप यांच बोलणं चालू असतानाच श्रीधर आवरून बाहेर येतो. श्रीधरला पाहून जगताप त्यांच्याकडे पाहून हसत म्हणतात.
“नमस्कार साहेब !! मी दत्तू जगताप ! आपल्या कंपनीत ऑफिसर म्हणुन कामाला आहे !!मी !! मी काल फोन केला होता आपल्याला !!”
श्रीधर त्यांच्याकडे क्षणभर पाहत राहतो. पन्नाशीचा तो माणूस पाहून श्रीधर त्यांना बोलतो. तेवढयात श्याम किचन मध्ये जातो.
“हो हो !! आपलं बोलणं झालं होत याआधी !! “
“चला मग !! मी कार घेऊन आलोय ऑफिसमध्ये जाण्यासाठी !! “
“ठीक आहे चला !!” श्रीधर जायला निघतो. तेवढ्यात श्याम किचन मधुन बाहेर येत त्याला थांबवतो,
“थांबा साहेब !! जेवण झालंच आहे !! मस्त डब्बा घेऊन जा !!”
“ठीक आहे दे !!” श्रीधर श्यामकडे हसत पाहून बोलला.
पाच दहा मिनिटे वाट पाहिल्यावर डब्बा घेऊन श्रीधर आणि जगताप दोघंही निघतात. पंधरा ते वीस मिनिटांनी ऑफिसमध्ये पोहचतात. ऑफिसमध्ये पोहचताच जगताप श्रीधर सोबत सर्वांची ओळख करून देतात.
” साहेब आपल्या ऑफिसमध्ये ऐकून ३५० कर्मचारी आहेत !! हेड ऑफिस मध्ये फक्त !! सर्वांशी ओळख करून देत बसलो तर रात्र इथेच होईल !!” जगताप मिश्किल हसत म्हणाले. आणि दोघेही चालत चालत सीईओ साहेबांच्या केबिन जवळ गेले. बाहेर बसलेला सेक्युरिटी गार्ड त्यांना पाहून आतमध्ये ते आल्याचे सांगायला जातो. थोडा वेळ लागतो आणि बाहेर येत त्यांना आतमध्ये जाण्यास सांगतो.
श्रीधर केबिनमध्ये समोर ठेवलेली पारितोषीक पाहत जातो. जगताप त्यांना बसण्याचा इशारा करतात. श्रीधर बसणार तेवढ्यात मागून एक साधारण साठीचा इसम चालत येतो. त्यांना पाहून जगताप उठून उभारतात. श्रीधरही उभा राहतो.
“बसा !!बसा !! ” समोरच्या खुर्चीवर बसत तो म्हणतो.
“साहेब श्रीधर जोशी !! आपले जनरल मॅनेजर !!”
“येस !! श्रीधर !! यंग मॅन !! वेरी हार्ड वर्किंग !! टॅलेन्टॆड पर्सन !! अस मी नाही तुझे सहकारी म्हणतात !! मी भास्कर देशमुख !! या कंपनीचा फौंडर आणि सीईओ !! “
श्रीधर फक्त त्यांच्याकडे पाहून हसतो. कंपनीच्या मालकांनी त्याची स्तुती केलेली पाहून तो आनंदून जातो.
“हो साहेब !! आपली भेट झाली होती मुंबईला !! मागच्या वर्षी आपल्या कंपनीच्या फॅमिली फंक्शनला आपण आला होतात !! तेव्हा मी ऑफिसर म्हणुन काम करत होतो !! “
“हो का !! ठीक अस आठवत नाही पण आपण पहिले भेटलो आहोत हे ऐकून छान वाटलं !! “
श्रीधर फक्त त्यांच्याकडे पाहून हसतो.
“राहायची सोय नीट झाली ना ??”
“हो साहेब !!एकदम मस्त बंगला आहे !! त्यामुळे काही प्रोब्लेम नाही !!”
“गुड !! करा मग सुरुवात कामाला !! “
“हो साहेब !!”
श्रीधर आणि जगताप खुर्चीवरून उठत बाहेर जाऊ लागले. तेवढ्यात पुन्हा देशमुख म्हणाले.
“जोशी !! पुण्याला एकटच आलात की फॅमिली घेऊन ?”
“सध्यातरी एकटाच आलोय !! बायको आणि मुलगी उद्या किंवा परवा येतील !!”
“ओके गुड !! बंगला तसा प्रशस्त आहे त्यामुळे आरामात राहाल सगळे !! आणि काही अडचण आली तर जगताप आहेतच !! “
” हो साहेब नक्की !!” श्रीधर साहेबांकडे पाहत हसला. आणि केबिनमधुन बाहेर आला.
सर्वांच्या गाठीभेटी,ओळख करण्यात एवढा वेळ गेला की त्याला संध्याकाळ केव्हा झाली हे कळलंच नाही. कार घेऊन तो ऑफिस संपल्यावर घरी आला. पाहतो तर घराचा दरवाजा उघडाच होता. आतमध्ये सगळ्या लाइट्स चालू होत्या. हॉलमध्ये येऊन पाहतो तर टीव्ही सुद्धा चालू होता.
“श्याम तर केव्हाच गेला असेल ! मग लाइट्स चालू कश्या !! दरवाजा उघडा कसकाय ?? का हा श्याम सगळं उघड ठेवून असाच गेला. त्याच काही सांगता येत नाही !! संध्याकाळ झाली की सगळं टाकून पळाला असेल !!” श्रीधर टीव्ही बंद करत म्हणाला. आणि फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये जाऊ लागला. तेवढ्या वेळात त्याला पैंजनाचा आवाज येऊ लागला. कोणीतरी मुलगी पायऱ्या वरून वर पळत जातानाचा भास त्याला झाला. तो त्या दिशेने जाऊ लागला.
“कोण आहे ?? कोण आहे तिकडं ??” अस बोलताच लाइट्स बंद होतात. श्रीधर मोबाईलची टॉर्च लावून तिकडे जातो. बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच, बेडरूमच्या लाइट्स चालू होतात आणि मोठ्याने,
“सरप्राइज !! ” असे आवाज येतात.
श्रीधर अचानक समोर कोण आले हे पाहून क्षणभर घाबरतो, आणि प्रिया आणि सायलीला पाहताच आनंदी होतो. आणि त्याला आश्चर्यही वाटतं
“सायली !! प्रिया !! तुम्ही दोघी इथे ??”
“येस पप्पा !! ” सायली श्रीधरला मीठी मारत म्हणते.
“केव्हा आलात तुम्ही ??” मला साधं कळवायच तरी होत ना !! “
“तुला सरप्राइज द्यायला मुद्दामच नाही सांगितलं !!” प्रिया मध्येच म्हणाली.
“हो का !” श्रीधर दोघींनाही मीठी मारत म्हणाला.
त्यानंतर तिघेही एकत्र बसून जेवले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले. या सगळ्या राड्यात रात्र हळू हळू पुढे सरकू लागली होती. त्या शांत बंगल्यात आता आवाज करणारी माणसे आली होती.