बंगला नंबर २२ || कथा भाग १ || शोध || Marathi Horror Story ||

टीप :” बंगला नंबर २२ ” ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून. ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशाने लिहिली आहे. यामधील पात्र , घटना , नाव ,स्थळ यांचा कोणत्याही मृत अथवा जीवंत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. जरी असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसेच या कथेत कोणत्याही अंधश्रध्देचे समर्थन लेखक करत नाहीत. त्यामुळे वाचकांनी ही कथा फक्त मनोरंजन या उद्देशानेच वाचावी.

कथा भाग १ || शोध ||

“ये !! कोणी आवाज करू नका रे !! जा जा जा इथून माझं बाळ झोपतय!! नाही हा माझ्या बाळा !! तुला कोणी बोलतं नाहीये !! झोप तू !! अरे झोप नारे !! या भयाण बंगल्यात फक्तं तू आणि मीच आहोत रे !! तुझे बाबा येथील आता !! आपल्याला घेऊन जातील सोबत !! बाबा येतील बर का !! खरंच कोणी येईल का रे इकडे ?? कोणी येईल का रे ?? ” ती मोठ्याने ओरडली. पण तीच ऐकणार कोणीच नव्हतं तिथे.

“आज कित्येक वर्ष उलटून गेली. मी वाट पाहतेय माझ्या त्यांची. येतील ते आणि मला आणि माझ्या मुलाला आपलंसं करतील. मग मध्ये जे घडून गेलं ते होत तरी काय?? आहे का रे कोण माझं ऐकणार इथे ??” ती पुन्हा ओरडली.

बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. कोणीतरी आतमध्ये येत होत.
“अरे नाही रे !! ऑफिसने मला राहायला मस्त बंगला दिलाय. टेन्शन नको घेऊस. दोन तीन दिवसात प्रिया आणि सायली पण येणार आहेत. मुंबईला दोघी ऐकट्याच काय करणार ना !!” कोणीतरी एक इसम मोबाइलवर बोलतं घरात आला.
घरात तो सर्वत्र पाहू लागला. आणि फोन ठेवत स्वत:लाच बडबडू लागला.
“बापरे !! काय धूळ झालिये इथे !! हे सगळं आता मला साफ करावं लागणार !!”
थोडा वेळ गप्प बसून पुन्हा बोलू लागला.
“जाऊदे आता !! रात्रही खूप झालिये !! सकाळी उठून करूयात !! असही उद्या ऑफिसला जायचं नाहीचे !!”

बेडरूम मध्ये जात असताना त्याचा फोन पुन्हा वाजतो. फोन उचलून तो बोलू लागतो,
“नमस्कार !! कोण बोलतंय ??”
“नमस्कार साहेब !! आपण श्रीकांत जोशी ना ??”
“हो श्रीकांत जोशी बोलतोय !! “
“मी दत्तू जगताप बोलतोय !! आपल्या पुण्याच्या शाखेचा ऑफिसर !! “
“अरे हो बोला !! “
“आपण आलात पुण्यात ?? भेटला आपल्याला बंगला नंबर २२ ?”
“हो भेटला!! म्हणजे शोधावा लागला !! पुण्याच्या थोडा बाहेर आहे म्हणून वेळ लागला !! काय माणसं आहेत !! कोणी सांगायला तयारच होईना !! आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर भुतासारखे तोंडाकडे बघायचे !!”
“काय आहे ना साहेब !! एवढ्या रात्री तुम्ही तिथे फिरताना पाहून आश्चर्य वाटलं असेल त्यांना !!”
” होना !! “
“आणि हो तुमच्या सेवेसाठी एक नोकर पण आहे तिथे !! येईल उद्या सकाळी !!”
“ठीक आहे !! काही हरकत नाही !!”
एवढं बोलून श्रीकांत फोन बाजूला ठेवून फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये जातो. फ्रेश होऊन पुन्हा वरच्या बेडरूम मध्ये येऊन झोपतो !!”

“कोण कुठला हा माणूस !! माझ्या घरात आलाय !! ये !! निघ इथून !! बाळा तू आत जा !! नाहीतर हा तुला मारून टाकणार !! जा बाळा जा !! “
त्या शांत वाड्यात अचानक खोलीतून बाहेर कोणीतरी पळत जातानाचा आवाज आला. श्रीकांत त्या आवाजाने जागा झाला. खोलीतून बाहेर येत त्याने चारी बाजूला पाहिलं. त्याला कोणीच दिसलं नाही. तो पुन्हा खोलीत आला आणि झोपी गेला. कोणता तरी भास झाल्यासारखं त्याला वाटलं.

कित्येक वेळ ती खोलीतल्या वरच्या माळ्यावरून त्याला पाहत राहिली.

“त्या खोलीत कोणीतरी येतंय !! प्रिया !! तू उठ !! उठ प्रिया !! कोणीतरी चोरपावलांनी येताणा दिसतंय !!पण मी इतका हतबल का ?? त्याच्या हातात चाकू आहे !! प्रिया उठ !! !!”

“उठ प्रिया ! उठ !!! ” श्रीधर झोपेतुन दचकून जागा झाला मोठ्याने ओरडतच. घामाने चिंब भिजून गेला होता. आजूबाजूला पाहतो तर भयाण अंधार पसरला होता.

शेजारीच ठेवलेल्या आपल्या मनगटातील घड्याळाकडे पाहत त्याने वेळ पाहिली.
“स्वप्न होत होय !! हुश्श !! काय रे !! आजची रात्र जाता जाईना ! ! एकतर प्रवासाने जीव थकून गेलाय आणि या नवीन जागेत मला झोप काही लागेना !! एक काम करतो पुस्तक वाचत बसतो !! “

श्रीधर पुस्तक घेण्यासाठी खाली हॉल मध्ये येतो तर समोर मेन डोअर उघडाच होता. त्याला बंद करायला जात तो बोलू लागला,
“घ्या ! मेन डोअर तर तसाच उघडा ठेवलाय !! एखादा चोर आला तर पहिल्याच दिवशी मला या शहरात कंगाल करुन जायचा !!”
श्रीधर दरवाजा बंद करणार तेवढ्यात त्याच्या पाठीमागून कोणी पाच सात वर्षाचा मुलगा दरवाजातून बाहेर जातो. त्याला पाहून श्रीधर क्षणभर भीतो. त्या मुलाच्या हसण्याच्या आवाजाने तो मागे सरकतो. आणि त्याच्याकडे पाहून बोलू लागतो.
“ये कोण रे तू !! आणि एवढ्या रात्री इथे काय करतोयस !! “
ते मूल त्याच्याकडे बघून फक्त हसत आणि त्याच्यापासून लांब पळत जात. श्रीधर त्याच्या मागे जातो. समोरच असलेल्या झाडाच्या मागे ते मूल जाऊन लपत. श्रीधर त्याच्या मागे मागे जातो.
“कोण रे तू !! हे बघ तुला पकडलं पकडलं !! हा पकडलं !! ” श्रीधर झाडाच्या मागे पाहत म्हणतो.
तिथे त्याला कोणीच भेटत नाही. पुन्हा ते मूल त्याच्या घरात जाताना त्याला दिसत.
“ये थांब !! ये थांब ! अरे ते माझं घर आहे !कोणाचा आहेस रे तू !! आणि एवढ्या रात्री या इथे काय करतो आहेस !! ” श्रीधर घरात पळत जाऊ लागतो. तेवढ्यात मेन डोअर जोरात बंद होतो.
“अरे !! काय आगाव कार्ट !! माझ्याच घरात शिरून ! मलाच घराबाहेर काढलं !! “
श्रीधर कित्येक वेळ दरवाजा वाजवतो पण दरवाजा काही उघडला जात नाही. शेवटी तो मागच्या खिडकीने आत शिरतो.

“कुठं आहेस रे कार्ट्या!! हे बघ निघ इथून !! तुझी आई काळजी करत असेल ना ?? “
“नाही ओ काका !! “
श्रीधरला मागून आवाज आला. तो मागे वळून पाहतो तर तिथे कोणीच नव्हतं. कित्येक वेळ तो त्याला शोधत राहिला. पण ते मूल त्याला काही सापडलं नाही. अखेर त्याला ते मुल मुख्य दरवाजातून बाहेर पळून जाताना दिसलं. त्यानंतर श्रीधर बेडरूममध्ये वाचत बसला. वाचता वाचता झोपी गेला.

सकाळ झाली तरी श्रीधर उठलाच नाही. अखेर मेन डोअर कोणीतरी मोठ्याने वाजवतंय या आवाजाने तो जागा झाला.

“आलो रे !!” कोण आलंय एवढ्या सकाळी सकाळी !! ” दरवाजा उघडत श्रीधर म्हणाला.
“काय राव साहेब एवढा वेळ !! म्हणलं आजुन पाच मिनिट तुम्ही दरवाजा उघडत नाहीतर मी हे निघालो असतो बघा !!”
“तू कोण ??”
“मी श्याम !! तुमचा नोकर कम फ्रेंड !!”
“अच्छा म्हणजे तुला दत्तूने पाठवल तर !! “
“होय साहेब !! “
“बरं बरं !! “

श्याम घरात आला. इकडे तिकडे बघू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर एक भीती दिसू लागली. त्याने न रहावुन श्रीधरला प्रश्न विचारला.

“साहेब रात्री किती वाजता आलात मग ??”
“१२.३० वाजले. काय रे तुमच्या गावातली लोक लवकर कोणी सांगेना मला बंगला नंबर २२ !! “
“इथली लोक असेच आहेत बघा !! “
“लोक !! अरे पोर सुद्धा !! काय एका आगावं कार्ट्याने मला त्रास दिलाय !! माझ्याकडून चुकून दरवाजा उघडा राहिला तर सगळ्या घरभर नुसता गोंधळ घातला त्याने!! तेही रात्री तीन साडेतीन वाजता !! वैताग नुसता !!”
“तीन वाजता !! ” श्याम थोड तुटक बोलला.
“नाहीतर काय !! दिसू दे पुन्हा !! चांगली अद्दल घडवतो त्याला !!”
“जाऊ द्या साहेब !! पोर आहेत ती !! “
“बरं ते सगळं जाऊदे !! तुझी काय ओळख ते तरी सांग!!”
“मी होय !! मी श्याम !! या सोसायटीच्या सुरवातीला एक झोपडपट्टी लागते तिथे राहतो मी !! एक बायको ,दोन मुलं असा सुखी संसार आहे बघा!! गेली पंचवीस वर्ष झाली इथे राहतोय !!”
“व्हा छान !! “

श्याम त्यानंतर कित्येक वेळ आपल्या कामात व्यस्त राहतो. श्रीधर आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवू लागतो. श्याम राहून राहून चारी बाजूला पाहत असतो.
“श्याम झाला का रे नाष्टा ??”
“हे काय !! झालाच की !! सगळं आवरलं आणि पहिलं नाष्टा केला !!”
“काय केलंस ??” श्रीधर गॅसवर ठेवलेली कढई उघडून पाहतो.
“व्हा पोहे !! “
“हो !! आता लवकरात लवकर तेच करता आले !!” श्याम पोह्यांची डिश श्रीधरकडे देत म्हणाला.

दोघेही हॉलमध्ये बसून पोहे खाऊ लागले. श्याम राहून राहून चारी बाजूला पाहत राहतो.
“काय रे काय झालं??”
“काही नाही साहेब !!” श्याम क्षणभर थांबतो आणि पुन्हा बोलतो
“साहेब तुम्हाला दुसरा बंगला नव्हता का हो ??”
“का रे ?? यात काय वाईट आहे !! मस्त आहे की हा बंगला ??”
“नाही म्हणजे आहे हा मस्त !!पण जरा जुनाट वाटतो म्हणून म्हटलं !!”
“ऑफिसन आता हाच सांगीतला त्यामुळे मला तरी पर्याय नाही बघ !!” श्रीधर पोहे खात म्हणाला.
“काय होणार नाही ??”
“नाही !! पण तुला काय रे एवढं ??”
“साहेब अस म्हणत्यात की या बंगल्यात भूत आहे !!”
“काय ??” श्रीधर मोठ्याने हसत म्हणाला.
“चेष्टा नाही साहेब !! काल तुम्हाला जे पोरगं दिसलं ते भूतच होत !!”
“काहीही काय श्याम !! अरे इथलच कुठलतरी होत पोरगं ते !! मी पाहिलं ना त्याला पळून जाताना !! “
“मी सांगायचं काम केलं !! पण एक सांगतो आंधार पडायच्या आत मी माझं काम उरकून निघून जाणार !!”
“बरं बरं !! सगळी नाटकं आहेत तुझी काम चुकवायची ना ! असुदे असुदे !! आणि हो उद्या परवा माझी मुलगी आणि बायको पण येणार आहेत त्यांच्यासमोर असलं काही बडबडू नकोस म्हणजे झालं!! आधीच माझी बायको प्रिया भित्री आहे !!”
“बायको आणि पोरगी ! साहेब कशाला उगाच रिस्क घेताय दुसरीकड बघा ना घर !! “
“नाहीरे श्याम !! ऑफिसने सांगितलय त्यामुळे नाकारता येणार नाही ! !! बाकी भुताची आयडिया मस्त हा ! जा बाबा लवकर घरी जा !! मी काही बोलणार नाही!”

दिवसभर श्याम आणि श्रीधर घर आवरत बसले. सगळ्या घरातली धूळ झटकून घेतली, खोल्या पुसून साफ केल्या. एवढ्या सगळ्या कामात संध्याकाळ केव्हा झाली. कळलंच नाही. श्याम घड्याळात पाहतो तर संध्याकाळचे सात वाजायला आले होते.

“बापरे सात वाजत आले!! साहेब !! मी निघतो लवकर !! तुम्हीपण जरा जपूनच राहा बर !! “
“हो रे !! “
श्रीधर मेन डोअर बंद करत म्हणाला. आणि मागे वळून खोलीत जाऊ लागला तेवढ्यात त्याला पुन्हा ते लहान मुल दिसलं.
“अरे तू पुन्हा आलास !” श्रीधर त्याच्या मागे धावू लागतो.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *