फ्री ब्लॉग म्हणजे काय ??

Part 2

फ्री ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय?? हा विषय आधी जाणून घेतला पाहिजे. Paid ब्लॉगिंग आणि फ्री ब्लॉगिंग मध्ये नक्की फरक तो काय हेही जाणून घेतल पाहिजे. ब्लॉगिंगमध्ये या गोष्टींचं महत्त्व, फायदे आणि तोटे किती आहेत हे पाहुयात. 

फ्री ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय!! तर निःशुल्क ब्लॉगींग. ना नफा ना तोटा या तत्वावर लिहिलेला ब्लॉग म्हणजे फ्री ब्लॉगिंग. यामध्ये आपण ज्या प्लॅटफॉर्मवर लिहीत असू त्या प्लॅटफॉर्मने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या साधनांवर आधारित ब्लॉग. त्याचे नक्की कोणते मुद्दे लक्षात घ्यावे ते पाहू ..

१. वैयक्तिक ब्लॉग

साधारणपणे या ब्लॉगला ना नफा ना तोटा हा विषय योग्य ठरतो. आपल्याला आपली आवड जपण्यासाठी , कुठेतरी व्यक्त होण्यासाठी एक मंच हवा असतो आणि तो मोफत मिळत असेल तर आपण नक्कीच त्याचा वापर करू.for example एखादा वैयक्तिक ब्लॉग म्हणजे कवितेंचा ब्लॉग, रोजच्या विचारांचा ब्लॉग आणखी काही जो आपण शब्द रुपात मांडतो, सहसा असे ब्लॉग हे फ्री ब्लॉग असतात किंवा ब्लॉगर्स ते फ्री ब्लॉग्ज ठेवतात.

२. No Extra charges

एखादा फ्री ब्लॉग जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण वापरत असलेला प्लॅटफॉर्म आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारात नाही. त्यांची service आपल्याला free मिळत राहते. आपण कितीही वेळा आपला ब्लॉग त्यामध्ये update करु शकतो. Yearly , monthly असे कोणतेच चार्जेस त्यात नसतात.

३. Can’t Earn Money

Free ब्लॉग लिहिताना त्यातून आपल्याला कोणत्याही स्वरूपात पैसा कमावता येत नाही. त्यामुळे फक्त लिखाण किंवा आपले विचार मांडण्याची संधी आपल्याला हे प्लॅटफॉर्म देतात.

४.लिमिटेड benefits

WordPress, Wix, blogger या प्लॅटफॉर्मवर Free ब्लॉगला लिमिटेड benefits असतात. त्यामुळे फ्री ब्लॉगर्स ना customization options हे लिमिटेड असतात. ते सहसा प्लॅटफॉर्मने उपलब्ध करून दिलेलेच असतात. Third party integration हे जवळ जवळ नसतेच. त्यामुळे फ्री ब्लॉगिंग साइटला संपूर्णतः प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहावं लागतं.

५. ब्लॉग address

Blog address म्हणजे आपल्या ब्लॉगचा डोमेन. फ्री ब्लॉगिंग मध्ये ब्लॉग address हा subdomain च असतो. जर आपल्या ब्लॉगचा address xyz.wordpress.com असेल तर त्यामध्ये xyz हे subdomain असते. आणि मुख्य डोमेन wordpress राहते. जे आपल्याला बदलता येत नाही. जर आपण एखादी पोस्ट शेअर केली तर त्याची url ही xyz.wordpress.com/postname ( url pattern वर आधारित) अशी राहते.

६. Vlog , चॅनल्स

Vlog किंवा इतर ब्लॉग चॅनल्स हे फ्री ब्लॉगिंग मध्येच येतात. पण पुढे जर आपल्या ब्लॉगची viewer’s संख्या वाढत गेली तर प्लॅटफॉर्म आपल्याला रेव्हेन्यू द्यायला चालू करतात. त्यातून ब्लॉगर्सना कमावण्याची संधी मिळते. त्यामुळेच youtube वरील ब्लॉगला पहिली पसंती मिळते. असे प्लॅटफॉर्म आपल्या चॅनल्सवर advertise दाखवतात, viewer’s ना ते customer’s मध्ये कन्व्हर्ट करतात व त्यातून मिळालेला रेव्हेन्यू हा चॅनल्सना मिळतो. हे चॅनल्सला सहसा बेसिक गोष्टींसाठी कोणताच शुल्क आकारत नाहीत. पण काही प्रमोशनल्स गोष्टींना मात्र शुल्क आकारला जातो, जसं की एखादा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जर तो boost केला, म्हणजे त्याची जाहिरात केली तर प्लॅटफॉर्म आपल्याकडून शुल्क आकारतात.

हल्ली काही इतरही नवीन प्लॅटफॉर्म आपल्या फ्री ब्लॉगिंग मध्ये कमावण्याची संधी उपलब्ध करून देतात पण त्यात खूप लिमिटेशन्स असतात. जर आपली वाचक/ viewer’s संख्या जास्त असेल तर एखादी प्रमोशनल पोस्ट किंवा एखाद्या guest ब्लॉग मधूनही आपल्याला कमावण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

या मुद्द्यांकडे पाहिलं असता फ्री ब्लॉगिंगचे advantages आणि disadvantages दोन्ही दिसून येतात. यामध्ये ब्लॉगर्सला नक्की काय हवं याच वर्गीकरण केल्यासारखं आहे. जर एक वैचारिक मंथन म्हणून ,आपले विचार लोकांनी वाचावे म्हणून आणि त्यातून कोणत्याही स्वरूपात नफा न पाहणाऱ्या ब्लॉगर्सला फ्री ब्लॉग लिहिण केव्हाही उत्तम.

ब्लॉगर्सची खरी सुरुवात ही इथूनच होते. जर पुढे ब्लॉगर म्हणून आपलं करिअर करायचं असेल तर नक्कीच फ्री ब्लॉग लिहायला सुरुवात करावी. कारण त्यातूनच पुढे आपण paid ब्लॉगिंग लिहायला सुरुवात करू शकतो किंवा तशी संधी आपल्याला चालून येते. त्याबद्दल आपण नक्कीच पुढच्या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत. Paid ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय ??

पुढील आर्टिकल वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की सबस्क्राईब करा …

READ MORE

ह्रदयस्पर्श E-Book

“ह्रदयस्पर्श !!” माझे पहिले E-Book मी आज आपल्या सर्वांसमोर सादर करत आहे. हे पुस्तक आपल्याला Kindle व…
Read More

नातं || NATE || MARATHI BLOG||

एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फ…
Read More

आठवणं || AATHVAN || KAVITA || LOVE ||

इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी की…
Read More

बाबा || MARATHI POEM

बाबा मनातल थोडं आज सांगायचं आहे!! बस जरा थोडा वेळ तुझ्याशी बोलायच आहे!! किती कष्ट करशील हा संसा…
Read More

तुझ्यात मी ..!! Tujyat Mi !!

समोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते …
Read More

बाबा || BABA Thodas MANATL

वाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला श…
Read More

बाबांची परी || BABANCHI PARI ||

बाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झो…
Read More
Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.