ती रुसल्यावर कधी
मी खुप तिला मनवायचो!!
पण मी रुसलेलो कधी
तिला कळालेच नाही!!
वाट हरवुन जाता तिने
पुन्हा मी वाट दाखवायचो!!
पण मी हरवुन गेल्यावर कधी
तिने मला शोधलेच नाही!!
अनोळखी होताच नाती ती
मी पुन्हा ओळख करुन द्यायचो!!
पण नात्यात उरलोच कधी तर
तिने मला पुन्हा जोडलेच नाही!!
शोधुनही न सापडता मला
पापण्यात मी तिला पहायचो!!
पण मी न सापडताच तिने
कधी ह्रदयात पाहिलेच नाही!!
मनातल्या कवितेत माझ्या
तिच्या सोबत पुन्हा मी जगायचो!!
पण ओठांवरच्या शब्दांत तिने
कधी स्वतःस पाहिलेच नाही!!
हे प्रेम मनात माझ्या
तिला का मी पुन्हा सांगायचो!!
पण काही केल्या तिला ते
कधीच का कळले नाही!!
-योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*