प्रेम माझं || HRUDAYSPARSHI KAVITA ||

"प्रेम म्हणतं मी
 ते व्यक्त करायला जावं!!
 हातात गुलाबाचं फुल देताना
 नेमकं तिच्या बाबांनी पहावं!!
 बाबा हाच आला होता
 तिने अस का म्हणावं!!
 आणि पुढचे काही दिवस मग
 एका डोळ्यानेच पहावं!!

 प्रेम हे मी कधी
 भावनांन मध्ये जपावं!!
 तिला व्यक्त करताना
 तिने येड्या सारखं हसावं!!
 चार पानी लिहुन ते
 तिला हळुच नेऊन द्यावं!!
 आणि तिने ते वाचताना
 चुकां सुधारून द्यावं!!

 प्रेम हे लांबुन मी!!
 चोरुन चोरुन बघावं
 आपली काय दिसते!!
 मनातंच का म्हणावं!!
 तिला बघताना नेमकं!!
 तिच्या भावाने पहावं!!
 आणि पावशेर पोराने ही
 उगाच भाव खाऊन जावं!!

 प्रेम हे मी कधी
 मनापासून करावं!!
 नेमकं त्यावेळी साला
 नशीबात न जमावं!!
 करायला जावं एक
 नेमकं मांजर आडव यावं!!
 आणि तिच्या आईने तेव्हा
 लग्नाची पत्रिका देऊन जावं!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *