प्रेम मला कधी कळलचं नाही. असं होत ना कधी कधी प्रेम अगदी जवळ असत आपल्या पण ते लक्षातचं येत नाही. त्या मनाचा त्या नाजुक भावनेचा कधी शोधच लागत नाही . असं होत ना कधी कधी जणु वाटते ..
"प्रेम मला कधी कळलचं नाही!! बागेतल्या फुलांकडे कधी वळलच नाही!! मनातल्या कोपर्यात कधी कोण दिसलच नाही!! म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .!! तिचं हसणं कधी पाहिलंच नाही!! त्याच रहस्य कधी जाणलंच नाही!! म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही!! तिचा सहवास कधी जाणलाच नाही!! तिच बोलणं कधी ऐकलच नाही!! म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही. .!! तिच लाजणं कधी उमगलंच नाही!! माझी काळजी करणं समजलंच नाही!! म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही!! तिच्या अश्रूचा अर्थ समजलोच नाही!! व्यक्त केलेलं प्रेम विसरु शकत नाही!! मनातुन तिचा चेहरा हटतच नाही!! म्हणुनच प्रेम मला कधी कळलचं नाही !!!!!! ✍योगेश