प्रेम ते || PREM TE LOVE POEM ||

Share This:
"नभातील चंद्रास आज
 त्या चांदणीची साथ आहे!!
 तुझ्या सवे मी असताना
 मंद प्रकाशाची साथ आहे!!

 हात तुझा हातात घेऊन
 रात्र ती पहात आहे!!
 चांदणी ती मनातले जणु
 चंद्रास आज सांगत आहे!!

 कुठे आज या रात्रीत
 बेभान ती झाली आहे!!
 मनातल्या भावनांस
 चौफेर उधळीत आहे!!

 प्रेम हे ह्रदयातले जणु
 चंद्रास खुलवीत आहे!!
 चांदण्याची कुजबुज ही
 रात्रीस बोलत आहे!!

 चांदणी ही चंद्रास आज
 प्रेम व्यक्त करत आहे!!
 ती रात्र ही जणु पुन्हा
 हरवुन जात आहे!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*