प्रेमरंग || PREMRANG || POEM ||

 "तुझ्या मिठीत मी हरवून गेले
 तुलाच न ते कधी का कळले?
 डोळ्यातूनी कित्येक बोलले
 परी मनातले मनात विरले!!

 कधी नकळत सांगून गेले
 सांगूनही तुला न उमगले!!
 उमगले तरी ओठांवर अडले
 तुझ्या हसण्यात सारे ते दडले!!

 तुझ्या हातात हात मी दिले
 सोबतीस या मला तू पाहिले!!
 तुझ्या वाटेवरती चालत आले
 एक तू एक मी बाकी न राहिले!!

 तुझ्यासाठी कित्येक क्षण दिले
 परी एक एक क्षण मज ते बोलले!!
 साठवून ठेवु तरी का बरसले?
 आठवात त्या तुझ्यासवे भिजले!!

 चांदण्यात तुला कित्येक शोधले
 कधी तू कधी ते भास ते झाले!!
 चंद्रास त्या सारे मी सांगितले
 का की उगाच मग ते हसले!!

 गंध ते सारे जणू सर्वत्र पसरले
 तुझे नि माझे जणू प्रेम आज फुलले!!
त्या पाकळ्यांत जणू मी बहरले
 जेव्हा तुझ्या मिठीत मी हरवून गेले !!"

 ✍️योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *