"वाटा पडतात मागे
 वळणे ही नवीन येतात!!
 कधी सोबती कोणी
 कधी एकांतात रहातात!!

 अंधारल्या वेळी ही कधी
 चंद्र तारे सोबत असतात!!
 कधी सुर्यास्त येता जवळी
 पक्षी घरट्या कडे जातात!!

 हा प्रवास माझा असा
 कधी नवीन सहप्रवासी असतात!!
 कधी जुन्या वळणावरती
 आपुले कोणी भेटतात!!

 थांबता क्षणभर कोठे
 हे मन का बोलु लागतात!!
 सुकलेली पाने गळुनी
 नवी पालवी फुटु लागतात!!

 चालतच राहावे आता
 हे प्रवास न आता थांबतात!!
 कधी सुटते साध आपल्याशी
 कधी अनोळखी हात धरतात!!

 वाटा पडतात मागे
 वळणे ही नवीन येतात… !!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एक आठवण ती!!!

Photo by @thiszun (follow me on IG, FB) on Pexels.comविसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी …
Read More