"पाहुनी तुझला एकदा
 मी पुन्हा पुन्हा का पहावे!!
 नजरेतुनी बोलताना
 ते शब्द घायाळ का व्हावे!!

 घुटमळते मनही तिथेच
 तुझ्या वाटेवरती का फिरावे!!
 तुला भेटण्यास ते पुन्हा
 कोणते हे कारण शोधावे!!

 उडणाऱ्या केसा सोबत
 हे मन वेडे का भिरभिरावे!!
 तुझ्याच त्या स्पर्शाने ही
 ते ऊगाच का मोहरुन जावे!!

 प्रेम असे हे मनात या
 ओठांवरती न दिसावे!!
 तुझ्या समोर मी असताना
 हे प्रेम व्यक्त का न व्हावे!!

 सांग सखे नजरेस या
 मनातले प्रेम डोळ्यात का दिसावे!!
 तुझ कळताच जेव्हा ते
 तु गोड हसुन का जावे!!

 ते हसने तुझे पहाताच
 मी पुन्हा पुन्हा का प्रेमात पडावे!!
 आणि पाहुनी तुझला मी एकदा
 पुन्हा पुन्हा का पहावे …!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE