"इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!! उन्ह सावल्यांचा खेळ हा सारा ती हळूवार झुळूक येऊदे ..!! स्पर्श व्हावा मनाला असा की जरा ओढ ती बोलूदे ..!! नव्याने फुटली ती पालवी अशी जणू पुन्हा ती बहरूदे ..!! गंध नव्या नात्याचा आता दाही दिशा पसरूदे ..!! कुठे बेफाम होऊन जावे कुठे अलगद टिपूस येऊदे ..! कुठे उगाच धावत जावे कुठे त्या घरास भेट देऊदे ..!! बघ तू जराशी मनात तुझ्या ओलावा तो तुझ जाणवूदे ..!! प्रत्येक थेंब सांगतो काही तुझ एकदा त्यास ऐकूदे ..!! बरसल्या कित्येक सरीत आता मला स्वतःस एकदा शोधूदे ..!! आठवांच्या या पावसात आता मिठीत तुला घेऊदे …!!! इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे ..!!" ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
