"न कळावे सखे तुला का
 भाव ते कवितेतले!!
 तुझ्याचसाठी चंद्र नी तारे
 वेचले मी जणु सुर जसे!!

 कधी बोलुनी लाटांस या
 आठवते ती सांज सखे!!
 कधी शोधती क्षण हे आपुले
 विरुन जाता पाहते कसे!!

 का असे बोलती पाखरे
 फुलांस आज ते पाहता जसे!!
 किती गुंफली माळ मनाची
 तरी तुला न कळते कसे!!

 वार्‍यासही शोधून सापडेना
 सुर जे हरवले असे!!
 बेधुंद शब्दाच्या वादळात जणु
 कित्येक भाव विरले कसे!!

 सांग काय राहिले मनाचे
 भाव जे अव्यक्त असे!!
 सुर ही हरवले शब्द ही थकले
 तरी मन हे अबोल कसे!!

 न कळावे भाव तुला का
 सखे माझ्या कवितेतले …!!!"​
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE