निषेध .!! पण कशाचा ???

एक पुतळा फुटला !! आणि अचानक मनातलं बोलला …! निषेध ..!!! पण कसला ?? पुतळा फुटला म्हणून !! अरे !! पण तो पुतळा जातीपातीत विभागला कोणी त्याला शोधा !! नाटकी हार !! नाटकी नमस्कार करणाऱ्या त्या ढोंगी माणसांना शोधा !! अरे मला (पुतळ्याला) फक्त कामापुरत आठवणाऱ्या त्या जमातीला शोधा !! अरे विचार जागवा !! विचारांचे पुतळे बांधा !! त्याला म्हणायचं वैचारिक वारसा !! अरे मी अबोल, निर्जीव !! पण तुम्हाला बोलेल माझ्यातील तो महापुरुष त्याच्या विचारातून !! त्याच्या कार्यातून !!! मी काय रे !! एकदा तरी फुटला जाणारच आहे !! पण विचार !! ते ना फुटतात !!ना जाळले जातात !!! उठा आणि निषेध करायचा सोडून !! विचारांचा पुतळा बांधा !!! हो एक निर्जीव पुतळा तुम्हाला सांगत आहे !! उठा !! विचारांच्या मागे जा !! पुतळ्यांच्या नाही !!!!

"फुटलेल्या या पुतळ्याचा आता
  कसला तू निषेध करतोस
  निर्जीव आणि अबोल माझ्यात
  महापुरुषास त्या शोधतोस!!

 राहिले कोणते विचार न इथे
  कसली आपुलकी दाखवतोस
  अरे लाज थोडी ठेवायची होती
  जाती धर्मात जेव्हा वाटतोस!!

 कधी नमस्कार!! कधी हार!
  उगाच नाटक करतोस
  अरे तुझ्याच स्वार्थासाठी तू
  माझाच अपमान करतोस!!

 उरले का रे महापुरुष एवढ्यात
  त्यांना फक्त माझ्यात तु पाहतोस
  अरे!! माणसा मला पुजण्या परी
  त्याच्या विचारास का न तू पुजतोस! !!

 नको मला हा एकांत आता
  जिथे तू कामा पुरता येतोस
  पक्षी बोलतात थोडे फार
  बाकी एकटाच बोलत असतो!!

 उगाच नको ते ओझे मोठेपणाचे
  उगाच मला महापुरुष करतोस
  तुकड्या तुकड्यात विखुरतो जेव्हा
  मलाच पाया खाली तुडवतोस ..!!!!

 अरे !! फुटलेल्या या पुतळ्याचा आता
  कसला तू निषेध करतोस ????"

 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *