"कधी मनात एकदा
 डोकावून पहावे!!
 नात्या मधले धागे
 जुळवून बघावे!!
 असतील रुसवे फुगवे
 बोलुन तरी पहावे!!
 घुसमटून गेलंय मन
 मोकळे करु बघावे!!
 वाईट आठवणींना
 पुसुन एकदा पहावे!!
 तानल्याने तुटते नाते
 सैल सोडून बघावे!!
 नको तो गैरसमज
 एकदा समजून बघावे!!
 वाईट नसतं कोणी
 आपलंस करुन पहावे!!
 नात्या मधले धागे
 जुळवून बघावे!!
 कधी मनात एकदा
 डोकावून पहावे!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*