नाती || NAATE MARATHI POEM ||

"नाती येतात आयुष्यात!!
 सहज निघुनही जातात!!
 मनातल्या भावना अखेर
 मनातच राहतात!!

 कोणी दुखावले जातात!!!
 कोणी आनंदाने जातात!!
 नात्याची गाठ अखेर
 सहज सोडुन जातात!!

 निस्वार्थ नाती खुप आठवतात!!
 स्वार्थी नाती उगाच सलत राहतात!!
 जीवनाचा हिशोब मात्र
 ही नातीच चुकवून जातात!!

 काही नाती क्षणभर राहतात!!
 काही नाती आयुष्यभर असतात!!
 सोबत म्हणुन कोणीतरी
 ही नातीच हवी असतात!!

 मी म्हणुन नाती नसतात!!
 प्रेम म्हणुन नाती राहतात!!
 एकांतात बसुनही मनात
 नातीच गोंधळ घालत असतात!!

 काही नाती बोलुन जातात!!
 काही नाती अबोल असतात!!
 मनातल्या भावना अखेर
 मनातच राहतात!!"
 ✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

बालपण || BALGIT || POEMS ||

Thu Jun 30 , 2016
आभाळात आले पाहुणे फार ढगांची झाली गर्दी छान पाऊस दादांनी भिजवले रान रानात साचले पाणी फार मित्रांनी केला दंगा छान कपडे भिजले आमचे फार कागदाची बनवली होडी छान होडी बुडाली भिजुन फार