"नाती येतात आयुष्यात!!
 सहज निघुनही जातात!!
 मनातल्या भावना अखेर
 मनातच राहतात!!

 कोणी दुखावले जातात!!!
 कोणी आनंदाने जातात!!
 नात्याची गाठ अखेर
 सहज सोडुन जातात!!

 निस्वार्थ नाती खुप आठवतात!!
 स्वार्थी नाती उगाच सलत राहतात!!
 जीवनाचा हिशोब मात्र
 ही नातीच चुकवून जातात!!

 काही नाती क्षणभर राहतात!!
 काही नाती आयुष्यभर असतात!!
 सोबत म्हणुन कोणीतरी
 ही नातीच हवी असतात!!

 मी म्हणुन नाती नसतात!!
 प्रेम म्हणुन नाती राहतात!!
 एकांतात बसुनही मनात
 नातीच गोंधळ घालत असतात!!

 काही नाती बोलुन जातात!!
 काही नाती अबोल असतात!!
 मनातल्या भावना अखेर
 मनातच राहतात!!"
 ✍️योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एक आठवण ती!!!

Photo by @thiszun (follow me on IG, FB) on Pexels.com विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी …
Read More

असावी एक वेगळी वाट !!!

“असावी एक वेगळी वाट, आयुष्य जगण्यासाठी !! रोजच जगणं यातून काही , वेगळं पाहण्यासाठी!! कधी बहरावी वेल…
Read More

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा