नातं माझं || NAAT MAJH || MARATHI BLOG ||

खरंच माझ काही चुकलं असेल तर मला माफ कर. .! अस म्हणणारी व्यक्ती आज शोधुनही सापडत नाही. नातं टिकवायला या गोष्टी खरंच खुप पुरेश्या आहेत अस मला वाटतं. कित्येक भांडणात त्या व्यक्तीचा अहंकार आणि मीपणा किती आडवा येतो हे वेगळं सांगायची गरजच नाही. मुळात काय चुकलंय हे जाणुन न घेता फक्त माझंच बरोबर अस म्हणणारी व्यक्ती आयुष्यात खरंच खुप कमी नाती टिकवु शकतात. त्यामुळे अशा व्यक्ती सहसा आपली चुक मान्यच करत नाही आणि त्याचा त्रास त्याचा जवळच्या लोकांना झाल्या शिवाय राहत नाही


मनाचे धागे कुठेतरी अशा लोकांशी जोडलेले असतात त्यामुळे इतर व्यक्ती ते सहनही करतीन. पण त्यालाही काही मर्यादा नक्कीच असतात. ते म्हणतातच ना की नातं ताणुन धरल्याने ते कधीतरी तुटतं आणि त्याचा त्रास दोघांनाही नक्कीच होतो. पण हे नातं ताणुनच का द्यायच हा ही एक प्रश्न आहे.


मुळात ऐकाने नातं ताणलं तर दुसर्‍याने सैल सोडावं अस म्हणतात. पण जो सैल सोडतो त्याला त्या व्यक्तीच्या बेबंद वागण्याचा त्रास नक्कीच होतो नाही का?


मग नक्की करायच तरी काय हा ही प्रश्न पडतो. नातं दोघांनीही ताणायच नाही हे ही मान्य आणि नातं सैल ही सोडायचं नाही हे ही मान्य. पण मग होणारा त्रास कुठेतरी कमी व्हायलाच हवा. मग राहतो एकच मार्ग नातं तोडुन टाकायचं. पण त्याने आठवणींना भरती येते नक्कीच.म्हणुन नातं हवंच असतं पण त्यामध्ये कधी त्याने माफी मागावी कधी आपण स्वतः माफी मागावी. कधी आपण चुक केली तर मोठ्या मनाने माफी मागावी हाही एक नातं टिकवायचा मार्ग नक्कीच आहे. आणि माफी मागण्यांने जर कोणाला कमीपणा वाटतं असेण तर अशी व्यक्ती कोणतंच नातं टिकवु शकत नाही हेही खरं.


मग राहता राहिला प्रश्न त्रास होण्याचा. अशावेळी भांडणाचं मुळ कारण दोघांनीही लक्षात घ्यायला हवं. एखाद्या गोष्टीचा आपल्याला भयंकर राग आला तर आपण आपल्या नात्यातील गोडवा जुन्या सुंदर आठवणी आठवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं राग कुठच्या कुठे निघुन जाईल. शेवटी लक्षात हेच ठेवायच की प्रत्येक नातं हे अनमोल असतं मग ते मैत्रीच असो किंवा इतर कोणतही ते समोर येताच आठवणींचा बाजार भरला पाहिजे. दुःखाचा डोंगर नकोच .. शेवटी मला असंच वाटतं नातं हे कसं होतं .

"नातं एक असच होतं!!
  कधी दुख कधी सुख होतं!!
  सुखाच तिथे घर होतं!!
  आणि मनात माझं प्रेम होतं!!

 कधी माफी कधी रुसन होतं!!
  क्षणात सारं जग होतं!!
  दुख कुठे पसार होतं!!
  आनंदाने नातं राहतं होतं!!

 कधी माझ कधी तुझ होतं!!
  आपुलकीची लाट होतं!!
  समुद्रासारख अथांग होतं!!
  आकाशा इतक मोठं होतं!!

 नातं एक असच होत
  कधी दुख कधी सुख होतं..!!"

 -योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

शर्यत (कथा भाग ७) || Sharyat Story Part 7 ||

सकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्याला पाहून आप्पा जवळ येत…

शर्यत ( कथा भाग ५) || Sharyat katha bhag 5 ||

"तो तिकडं पाणी भरतोय !! तुझ्या इलाजाचे पैसे नव्हते त्याच्याकडे, म्हणून करतो म्हणाला काम !!" शांताला हे कळताच तिला रडू…

शर्यत (कथा भाग ४ ) || Sharyat katha bhag 4 ||

"भूक लागली असलं ना ??" सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला. शांता पाणी घटाघटा प्याली. "पोटात…

द्वंद्व (कथा भाग ५) शेवट भाग

विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सायली अखेर भेटेल…

द्वंद्व (कथा भाग ४)

विशालच स्वतःतच मग्न राहणं. सदाला पुन्हा पुन्हा नकळत सायलीबद्दल विचारणं, आईला विशालच्या वागण्याचं नवल वाटावं आणि अखेर भूतकाळ आणि वर्तमान…

द्वंद्व (कथा भाग ३)

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले…

द्वंद्व (कथा भाग २)

विशालच्या समोर अचानक आलेली पायल हा त्याचा भास होता की सत्य? आईच्या मनातली विशाल बद्दलची खंत आणि एक निरागस प्रेम…

विरोध ..(शेवट भाग)

शेवट भाग “प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला…

विरोध ..(कथा भाग ५) || VIRODH MARATHI KATHA ||

भाग ५  अनिकेतलाही आता प्रितीच्या अश्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ लागला होता. प्रितीला थोड लांब करत तो तिला बोलू लागला.…

विरोध ..(कथा भाग ४) || MARATHI PREM KATHA ||

भाग ४ मेसेज टोन वाजताच अनिकेत श्वेता पासून लांब जातो. मोबाईल मध्ये पाहतो आणि पुन्हा मोबाईल खिशात ठेवून तिच्या जवळ…

Next Post

सांजभेट || Cute Heart Touching love stories ||

Sat Oct 29 , 2016
मज वाट एक अधुरी दिसते तुझी साथ हवी होती त्या वळणावरती एकदा तुज पहायची ओढ होती मनात तुझ्या एक सल मला बोलायची होती माझ्या मनाची बैचेनी तुला सांगायची होती