खरंच माझ काही चुकलं असेल तर मला माफ कर. .! अस म्हणणारी व्यक्ती आज शोधुनही सापडत नाही. नातं टिकवायला या गोष्टी खरंच खुप पुरेश्या आहेत अस मला वाटतं. कित्येक भांडणात त्या व्यक्तीचा अहंकार आणि मीपणा किती आडवा येतो हे वेगळं सांगायची गरजच नाही. मुळात काय चुकलंय हे जाणुन न घेता फक्त माझंच बरोबर अस म्हणणारी व्यक्ती आयुष्यात खरंच खुप कमी नाती टिकवु शकतात. त्यामुळे अशा व्यक्ती सहसा आपली चुक मान्यच करत नाही आणि त्याचा त्रास त्याचा जवळच्या लोकांना झाल्या शिवाय राहत नाही
मनाचे धागे कुठेतरी अशा लोकांशी जोडलेले असतात त्यामुळे इतर व्यक्ती ते सहनही करतीन. पण त्यालाही काही मर्यादा नक्कीच असतात. ते म्हणतातच ना की नातं ताणुन धरल्याने ते कधीतरी तुटतं आणि त्याचा त्रास दोघांनाही नक्कीच होतो. पण हे नातं ताणुनच का द्यायच हा ही एक प्रश्न आहे.
मुळात ऐकाने नातं ताणलं तर दुसर्याने सैल सोडावं अस म्हणतात. पण जो सैल सोडतो त्याला त्या व्यक्तीच्या बेबंद वागण्याचा त्रास नक्कीच होतो नाही का?
मग नक्की करायच तरी काय हा ही प्रश्न पडतो. नातं दोघांनीही ताणायच नाही हे ही मान्य आणि नातं सैल ही सोडायचं नाही हे ही मान्य. पण मग होणारा त्रास कुठेतरी कमी व्हायलाच हवा. मग राहतो एकच मार्ग नातं तोडुन टाकायचं. पण त्याने आठवणींना भरती येते नक्कीच.म्हणुन नातं हवंच असतं पण त्यामध्ये कधी त्याने माफी मागावी कधी आपण स्वतः माफी मागावी. कधी आपण चुक केली तर मोठ्या मनाने माफी मागावी हाही एक नातं टिकवायचा मार्ग नक्कीच आहे. आणि माफी मागण्यांने जर कोणाला कमीपणा वाटतं असेण तर अशी व्यक्ती कोणतंच नातं टिकवु शकत नाही हेही खरं.
मग राहता राहिला प्रश्न त्रास होण्याचा. अशावेळी भांडणाचं मुळ कारण दोघांनीही लक्षात घ्यायला हवं. एखाद्या गोष्टीचा आपल्याला भयंकर राग आला तर आपण आपल्या नात्यातील गोडवा जुन्या सुंदर आठवणी आठवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं राग कुठच्या कुठे निघुन जाईल. शेवटी लक्षात हेच ठेवायच की प्रत्येक नातं हे अनमोल असतं मग ते मैत्रीच असो किंवा इतर कोणतही ते समोर येताच आठवणींचा बाजार भरला पाहिजे. दुःखाचा डोंगर नकोच .. शेवटी मला असंच वाटतं नातं हे कसं होतं .
"नातं एक असच होतं!! कधी दुख कधी सुख होतं!! सुखाच तिथे घर होतं!! आणि मनात माझं प्रेम होतं!! कधी माफी कधी रुसन होतं!! क्षणात सारं जग होतं!! दुख कुठे पसार होतं!! आनंदाने नातं राहतं होतं!! कधी माझ कधी तुझ होतं!! आपुलकीची लाट होतं!! समुद्रासारख अथांग होतं!! आकाशा इतक मोठं होतं!! नातं एक असच होत कधी दुख कधी सुख होतं..!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*