“क्षणात वेगळ व्हावं
इतक नातं साधं नव्हतं
कधी रुसुन कधी हसुन
सगळंच इथे माफ होतं

विचार एकदा मनाला
तिथे कोण राहत होतं
कधी ओठांवर कधी अश्रुमध्ये
सतत माझं नाव होतं

तु रुसावंस मी चिडावं
नातं हे दुरावलं होतं
तु न बोलावंस मी ही रागवावं
सगळच इथे बिघडलं होतं

मी माझा विसरून जावं
तुही कुठे हरवुन जावीसं
मग सारे बंध तुटावेत
इतक ते सैल नव्हतं

कधी आठवणीत पहावं
राग सारा विसरुन बघावं
नातं हे आपल आजही
तिथेच आपली वाट पाहतं होतं!!”

– योगेश खजानदार