नव्या वाटा…!! || NAVYA VAATA MARATHI POEM ||

"नव्या वाटांच्या शोधात
 पाखरांनी घेतली भरारी!!
 उठ तूही आता
 सोडून दे कालची काळजी!!

 मुक्त फिरायला हे आकाश
 बोलावते आहे तुजला आता!!
 कोणता विचार मनात घेऊन
 थांबला आहेस तू या क्षणी!!

 सूर्याची ती किरणे
 खुणावत आहेत तुला नव्यानी!!
 उठ सज्ज हो आता
 पसुरून ज्यांना दाही दिशी!!

 त्या वाऱ्यासही पुन्हा आता
 नव्या स्वप्नांची आस लागली!!
 तुझ्या डोळ्यात एक वाट
 नव्याने यावी त्यास दिसूनी!!

 कोणती ही नवी आशा
 सर्वत्र गेली पसरुनी!!
 तुझ्या मनात आज नसावा
 कोणताही कालचा राग मनी!!

 ही नवी आशा ही नवी दिशा
 बोलते आहे तुजला नव्याने!!
 उठ तू आता पुन्हा
 आणि सोडून दे कालची काळजी!!"

 ✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

स्वप्नांच्या पलीकडे || SWAPNANCHYA PALIKADE || POEM ||

Tue Mar 27 , 2018
स्वप्नांच्या ही पलिकडे एक घर आहे तुझे त्या घरात मला एकदा यायचं आहे