"नव्याने पुन्हा ती वाट दिसली
 जिथे आजही तुझी ओढ आहे!!
 नको म्हटले तरी क्षणभर ते थांबले
 नजरेत आजही तुझाच चेहरा आहे!!

 कसे सावरू या मनास आता
 ते पारिजातक जिथे सुकून गेले आहे!!
 आठवांचा तो गंध पसरला जिथे
 त्या वळणावरती तुझीच सोबत आहे!!

 सांग कसे विसरून जावू त्या क्षणास
 जिथे ती पाऊलखुण आजही बोलकी आहे!!
 सांग कसे हरवून जाऊ मी स्वतःस
 जिथे तुझा सहवास सतत सोबत आहे!!

 सावरू कसा मी डोळ्यातील अश्रुस
 जिथे आयुष्यभराचे वचन तू दिले आहे!!
 आजही ती मिठी जणू पुन्हा बोलताना
 हृदय माझे का चिंब भिजत आहे!!

 उरल्या काही फांद्यावरती पुन्हा आज का
 नव्याने ती जणू पालवी फुटली आहे!!
 नात्यांच्या या नाजूक वळणावरती
 पुन्हा एकदा तुझी भेट होत आहे!!

 एक झुळूक कानाशी येऊन तेव्हा
 हळूच मज का सहज बोलते आहे
 तुझ्या असण्याची जाणीव मज तेव्हा
 अलगद का करून देत आहे..!"

 ✍️©योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE